सचिनशेठ बाईत यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटनात व्यक्त केली खंत
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 16 : पावसाळी अधिवेशन होते या पावसाळी अधिवेशनात हिंवाळी अधिवेशनाची तारीख ठरवीली जाते व निश्चित केली जाते याची कल्पना गटशिक्षणाधिकारी भागवत मॅडम आपल्याला अगोदरच असायला हवी होती. मी आमदार भास्करशेठ जाधव यांच्या समवेत गेले दोन – तीन दिवस होतो मी त्यांना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन सोहळ्याला येण्याची विनंती केली यावर ते म्हणाले, अधिवेशन आणि विज्ञान प्रदर्शन या तारखा एकाच वेळेला असल्यामुळे या कार्यक्रमाला येणं थोडं अवघड आहे. जर आमदार महोदय या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला आले असते तर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची उंची निश्चीतपणे वाढली असती, त्याच्याकडून वेगळ्या पद्धतीचे मौलिक मार्गदर्शनही मिळाले असते. पण तसं नियोजन शिक्षण विभागाकडून झालं नाही अशी खंत लोकशिक्षण मंडळ आबलोली या शिक्षण संस्थेचे सीईओ श्री.सचिनशेठ बाईत यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटनच्यावेळी व्यक्त केली. Date of Convention and Science Fair is same

सचिनशेठ बाईत पुढे म्हणाले की, मॅडम तुमच्या शैक्षणिक विभागाच्या सहली वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात परंतू आपण सहली नेत असताना प्रामुख्याने विचार करतो की, विद्यार्थ्यांना मोठ मोठे उद्योग दाखवीणे, मोठी मंदिरे दाखवीणे पर्यटन स्थळे दाखवीणे पण ख-या अर्थाने आपल्या विद्यार्थ्यांना या भागांमध्ये कुठले उद्योग धंदे व्यवसाय होऊ शकतात म्हणजेच आंबा, काजू, कोकम आदी. फळांवरती,भाजीवरती प्रक्रीया करुन जे उद्योग धंदे चालतात (रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील)त्या उद्योगांना शैक्षणिक उठावामधून सहली महोत्सवातून हे उद्योगधंदे मोठमोठे प्रकल्प विद्यार्थ्यांना दाखवीले तर भविष्यात पुढे या विद्यार्थ्यांमधून उद्योजक सुद्धा तयार करता येतील असे स्पष्ट मत सचिनशेठ बाईत यांनी व्यक्त केले. Date of Convention and Science Fair is same

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष श्री.चंद्रकांतशेठ बाईत, पंचायत समिती गुहागर चे गटविकास अधिकारी (गट- अ) श्री.तुकाराम जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.प्रमोद केळस्कर, गटशिक्षणाधिकारी श्रीमती.लिना भागवत, गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष मंगेश गोरीवले, आबलोलीच्या सरपंच सौ.वैष्णवी नेटके, जिल्हा विज्ञान मंडळाचे कार्यकारणी सदस्य श्री.सुदेश कदम, श्री.तुकाराम निवाते, सुहास गायकवाड, अमोल होवाळे, श्री.शार्दुल, राकेश साळवी, यांचेसह सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय राजमाने यांनी केले तर श्री.धनाजी यांनी सर्वांचे आभार मानले. Date of Convention and Science Fair is same
