घटस्थापनेपासून सुरुवात ; देवीभेटीचा मान दीपक चव्हाण यांच्याकडे
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील पाटपन्हाळे गावामधील नवसाला पावणाऱ्या दसरागौरीच्या उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. यावर्षीचा देवीभेटीचा मान ग्रामस्थ दीपक तुकाराम चव्हाण व उदय तुकाराम चव्हाण या दोन बंधूंच्या सनिवासस्थानी देवी विराजमान होणार आहे. याबाबत नुकतीच ग्रामस्थांची बैठक झाली. Dasargaur festival at Patpanhale

पाटपन्हाळे गावातील चव्हाण भावकितील मानकरी आहेत. त्यापैकी रामदास चव्हाण, रविंद्र चव्हाण, दिपक चव्हाण, संदिप चव्हाण असे हे मानकरी आहेत. याच चार जणांपैकी एकाच्या घरी प्रतिवर्षी ही दसरा गौर येत असते. गावातील पायरवणे या ठिकाणाहून ही गौर तेरडयाच्या स्वरूपात आणली जाते. ज्या मानकऱ्याच्या घरी ती बसते त्या ठिकाणी नऊ दिवस दसऱ्याचा उत्सव साजरा केला जातो. सायंकाळी सर्व गावकरी एकत्र येवून जाकडी भरतात. आणि याच वेळी एका सवाष्णीच्या किंवा कुमारीकेच्या अंगात देवी येते. ही देवी नवसाला पावते ही सर्व दुरपर्यंत या देवीची ख्याती आहे. Dasargaur festival at Patpanhale

सर्व गावकरी आणि मानकरी मिळून या देवीचा उत्सव साजरा करतात. संपूर्ण परिसरात विलोभनिय अशी रोषनाई केली जाते. आरती, टाळ, मृदुंग यांच्या वाद्याने वातावरण अगदी प्रसन्न आणि भक्तिमय होवून जाते. हा उत्सव म्हणजे प्रत्येक पाटपन्हाळे रहीवाशांसाठी प्रेरणादाई असाच असतो. दुर्गामाता आणि नवचंडीच्या या उत्सवाचा आणि देवीच्या दर्शनाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन नवरात्रोउत्सव मंडळ अध्यक्ष सुधाकर चव्हाण व सेक्रेटरी राजेंद्र चव्हाण यांनी केले आहे. Dasargaur festival at Patpanhale
