महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहीम
गुहागर, ता. 17 : नळपाणी योजनेच्या विहिरीसाठी तसेच शेती बागायती साठी पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, असे उद्गार ग्रामपंचायत वेळंबच्या सरपंच समिक्षा बारगोडे यांनी काढले. Dams from labordonation at Welamb

पंचायत समिती गुहागरच्या महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहीम २०२२-२३ अंतर्गत ग्रामपंचायत वेळंब येथील कातळवाडी पऱ्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी सरपंच समिक्षा बारगोडे यांनी मत व्यक्त केले. या बंधाऱ्याचा उपयोग कातळ वाडीतील नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीसाठी तसेच वाडीतील नारळ सुपारीच्या बागायतीसाठी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. Dams from labordonation at Welamb

यावेळी सरपंच समिक्षा बारगोडे, उपसरपंच श्रीकांत मोरे, कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, कृषी सहाय्यक श्री. गवारी, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राणे, सुरेश जाधव, परशुराम घाडे, वैष्णवी घाडे, प्रगती माळी, पोलीस पाटील स्वप्नील बारगोडे, अनिल बारगोडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, महिला बचत समुहाच्या सी.आर. पी., कातळवाडी अध्यक्ष सुरेश रहाटे, आशा सेविका, महिला मंडळ व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून श्रमदान केले. Dams from labordonation at Welamb
