धोपावे-तेटले ग्रामस्थांच्या श्रमदानातून दोन बंधारे
गुहागर, ता. 15 : गुहागर पंचायत समितीच्या वतीने महात्मा फुले जल भुमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेतील मिशन बंधारे उपक्रमांतर्गत धोपावे-तेटले येथे दोन बंधारे बांधण्यात आले. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. Dams built by villagers at Dhopave-Tetle


ग्रामपंचायत धोपावे तेटले कार्यक्षेत्रात सोमवार दिनांक १३/०२/२०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता मिशन बंधारे ही मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत गावातील नदीवर पंधरा आणि दहा मीटरचे दोन बंधारे बांधण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवले गेले. त्या पाण्याचा उपयोग नळपाणी पुरवठा योजने करीता तसेच दैनंदिन कामकाजाकरिता करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतने केलेल्या या आवाहनाला ग्रामस्थांनी भरपूर प्रतिसाद दिला. ही मोहीम यशस्वी करण्याचे खरे श्रेय महिलांना देण्यात आले. Dams built by villagers at Dhopave-Tetle


आपल्या समस्या आपणच आपल्या सर्वांच्या सहकार्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करत राहू. ही मोहीम यशस्वी करण्याचे श्रेय हे महिलांचे आहे. तरी सर्व महिलांनी व ग्रामस्थानी ज्यांना आपल्याला शक्य होईल अशी मदत केल्याबाबत सर्वांचे सरपंच यांनी मनःपूर्वक आभार मानले. Dams built by villagers at Dhopave-Tetle


यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्री.आशिर्वाद पावसकर, उपसरपंच श्री. संदीप पवार, सदस्य सौ. अभिलाषा गुडेकर, सौ.निकीता पावसकर, श्रीमती दर्शना पावसकर, श्रीमती ऐश्वर्या जांभारकर, सौ.रश्मी नाटेकर, श्री.अनंत डावळ, श्री.सुधाकर भडसावळे, सौ.सरीता जाधव ग्रामसेविका रोहीणी तवसाळकर, कृषी अधिकारी सौ. रेश्मा जाधव उपस्थित होते. बाळाराम गुडेकर, संजय भोरजी, अंकुश शिगवण, प्रभाकर चाळके, विकास नाटेकर, सोहम गुडेकर, समिर मालदोलकर तसेच पाटील वाडी, गुडेकर वाडी, जाधववाडी, विघ्नहर्ता वाडी, हनुमान वाडी येथील ग्रामस्थांनी आणि महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात श्रमदान करुन गावाबद्दलची बांधिलकी जपली. Dams built by villagers at Dhopave-Tetle