गुहागर, ता. 18 : महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत पंचायत समिती गुहागरच्या वतीने मिशन बंधारे ही मोहीम तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत कारूळ ग्रामपंचायतीच्या वतीने ४ बंधारे बांधण्यात आले आहेत. Dams at Karul under Mission Dams Mission
यंदा पाऊस खूप उशिरा पर्यंत पडला असल्यामुळे नदी-नाल्यांमध्ये, प-याला अजूनही पाण्याचे प्रवाह वाहताना दिसत आहेत. तरीही दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता उन्हाळ्यात हे नाले कोरडे पडतात. याचा परिणाम प-याशेजारी असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेवर होतो. विहिरीची पाण्याची पातळी कमी होत जाते. त्यामुळे कारुळच्या सरपंच सौ. मिनल जोशी यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या व महिला ग्राम सेवा संघाच्या सहकार्याने कारूळ गावात २ विजय व २ कच्चे बंधारे बांधण्यात आले. या बंधा-यामुळे वाहणारे पाणी अडून बंधारा भरून पाणी वाहू लागले आहे. Dams at Karul under Mission Dams Mission
यावेळी उपसरपंच एकनाथ मोहित, ग्रामसेवक एस. डी. जाधव आणि कर्मचारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवा संघातील सर्व महिला, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्री. पेढांबेकर व सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका श्रीमती अरूणा गुरव आणि विद्यार्थी यांनी हे बंधारे बांधण्यासाठी श्रमदान केले. यापैकी २ विजय बंधारे (गावठाण व मंदिराजवळ) अंदाजे ४५ फुट लांबीचे बांधण्यात आले आहे. Dams at Karul under Mission Dams Mission