• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पांगारी तर्फे वेळंब येथे बांधले २ बंधारे

by Mayuresh Patnakar
January 6, 2023
in Guhagar
109 1
0
Dam campaign at Pangari by welamb
213
SHARES
609
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत  मिशन बंधारे मोहीम

गुहागर, ता. 06 : पंचायत समिती गुहागरच्या वतीने महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत  मिशन बंधारे ही मोहीम तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत पांगारी तर्फे वेळंबच्या वतीने ‘मिशन बंधारे’ उपक्रमांतर्गत दि. ३ जानेवारी २०२२ रोजी गावातील नदीवर २५ मीटर लांबीचे २ विजय बंधारे बांधण्यात आले. Dam campaign at Pangari by welamb

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत गेली अनेक वर्ष पांगारी वेळंब ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ग्रामस्थांकडून श्रमदानातून बंधारे बांधण्यात येतात. हे २५ मीटर लांबीचे २ बंधारे बांधल्यामुळे लाखो लिटर वाहून जाणारे पाणी अडले आहे. या बंधा-याचा उपयोग गावातील नळपाणी पुरवठा योजनेच्या विहीरीतील पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी होतो. नदीशेजारी असलेल्या नारळ- सुपारी च्या बागांनाही या पाण्याचा उपयोग होतो. Dam campaign at Pangari by welamb

Dam campaign at Pangari by welamb

यावेळी सरपंच विष्णू वीर यांनी केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनी भरपूर प्रतिसाद देवून मोठ्या प्रमाणात महिलाही उपस्थित होत्या.  यावेळी सरपंच विष्णू वीर,  ग्रामपंचायत सदस्य विद्या खांबे, सुजाता खांबे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप खांबे, कृषी अधिकारी आर.के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, मंडळ कृषी अधिकारी श्री.पिसाळ, कृषी पर्यवेक्षक प्रदीप गवारी, कृषी सहाय्यक अमीत शेळके, ग्रामसेवक विनोद तोडणकर, यांच्यासह शिवाजी खांबे, अनंत खांबे, शिवराम तांबे, अनुराधा खांबे, ग्रामपंचायत कर्मचारी, खांबेवाडी, तांबेवाडी, फौजदारवाडी, गिजेवाडीतील अनेक ग्रामस्थ, महिला बचतगटांच्या महिलांनी श्रमदान केले. Dam campaign at Pangari by welamb

Tags: Dam campaign at Pangari by welambGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share85SendTweet53
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.