गुहागर, ता. 08 : तालुक्यातील शृंगारतळी येथील बाजारपुल मार्केट येथील दहीहंडी उत्सव तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली होती. शृंगारतळी बाजारपेठ पुल मार्केट येथील सर्व व्यापारी एकत्र येऊन दरवर्षी मोठ्या उत्साहात दही हंडी उत्सव साजरा करतात. Dahi handi on the Sringaratali market bridge

यावर्षीही या उत्सवामध्ये शृंगारतळी बाजारपेठ पुल मार्केट व्यापारी तसेच अन्य व्यापाऱ्यासह आठवडा बाजारामध्ये सहभागी असणारे व्यापारी सर्वजण सहभागी होऊन उत्सवाचा आनंद लुटला. सर्व व्यापारी प्रतिकूल परिस्थितीमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करत असतात. हे या दहीहंडीचे वैशिष्ट्य आहे. या दहीहंडी उत्सवासाठी तालुक्यातील अनेक गोविंदा पथकाने सलामी दिली. गोविंदा पथकासाठी विशेष काळजी घेण्याचे काम येथील सर्व व्यावसायिक करत होते. हजारोंच्या उपस्थितीत ही दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. Dahi handi on the Sringaratali market bridge

या उत्सवासाठी उत्सव प्रमुख सुभाष रजपुत, रामचंद्र देवळेकर, जितेंद्र शिरगावकर, दत्ताराम कोंडविलकर, विनोद जानवळकर, विनायक शिर्के, विठ्ठल घाणेकर, किरण पोळेकर, कमलाकर वनगे, सुनिल बेंद्रे, गणपत पागडे, महेश अवेरे, वसंत जानवळकर, मनोहर कळंबटे, प्रशांत शिरगावकर हे सर्व व्यापारी तसेच अन्य व्यापारी एकत्र येऊन त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार हा उत्सव साजरा करतात. यावेळी दिवसभर विविध समजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. आलेल्या सर्व मान्यवरांचा व भाविकांचा गुलाब पुष्प देउन गौरव सर्व व्यापारी करत होते. एकंदरीत उत्साही वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. Dahi handi on the Sringaratali market bridge

