रत्नागिरी, ता. 21 : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात गुरुवारी सकाळी बालगोविंदांनी दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषी वातावरणात साजरा केला. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला. Dahi Handi in Aagashe Vidyamandir


शाळेतील या उपक्रमाकरिता महिला, पुरुष पालकांची भरपूर मदत लाभली. सुरवातीला कृष्णगीतांवर बालगोविंदांनी नृत्याचा आनंद लुटला. त्यानंतर पाण्यात भिजून गोविंदांनी हंडी फोडली. हंडीला फुलांचे हार घालून सजवण्यात आली. ही सर्व सजावट पुरुष पालकांनी केली. मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांच्या नेतृत्वाखाली वर्गशिक्षकांनी नृत्य व कार्यक्रमाचे नियोजन केले. शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर यांच्यासमवेत सतीश दळी, राजेंद्र कदम, संजय चव्हाण आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. महिला पालकांनी फेर धरून कृष्णगीतावर नृत्य केले. त्यात सर्व शिक्षिका, सेविका सहभागी झाल्या. हंडी फोडल्यानंतर सर्वांना पोह्यांचा आणि विविध फळांचा प्रसाद देण्यात आला. Dahi Handi in Aagashe Vidyamandir


अशाप्रकारे कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरातील बालगोविंदांनी, शिक्षक व पालकांनी दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोष्यात व आनंदात साजरा केला. Dahi Handi in Aagashe Vidyamandir