विक्रांत आलेकर, अनंत तानकर, हर्षदा कुलकर्णी विजेते
गुहागर, ता. 07 : सुवर्णसूर्य फाउंडेशन, कलांगण-संगमेश्वर आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित तिसऱ्या सायक्लोथॉन पर्वाचे विजेते चिपळुणचे विक्रांत आलेकर ठरले. अवघ्या १ तास ३३ मिनीटांत त्यांनी तब्बल ४२ किमीचे अंतर पार करून विजय मिळवला. आलेकर बंधूंनी सलग तिसऱ्या वर्षी क्रमांक पटकावून स्पर्धा गाजवली. त्यांच्यापाठोपाठ पुण्यातील आकाश लकेश्री आणि सांगलीतील संतोष शिंदे यांनी काही सेकंदाच्या फरकाने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. Cyclothon by Ratnagiri Cyclist Club

या स्पर्धेत ४० वर्षांवरील गटामध्ये अनंत तानकर (गुहागर), मिलिंद खानविलकर (दापोली), डॉ. तेजानंद गणपत्ये (चिपळूण) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. महिलांच्या गटामध्ये हर्षदा कुलकर्णी (रत्नागिरी), आरती दामले (रत्नागिरी) आणि अन्वयी बापट (चिपळूण) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. Cyclothon by Ratnagiri Cyclist Club
एकही खड्डा नसलेला रस्ता, वळण, उतार व चढावांचा घाट तसेच सपाट रस्ता असलेल्या संगमेश्वर स्टॅंड ते देवळे या मार्गावर ही अतिशय दर्जेदार स्पर्धा झाली. देवळे येथे रंग अवधूत महाराजांच्या मठापर्यंत निघालेल्या पेडल फॉर स्पिरिच्यअॅलिटी सायक्लोथॉनमध्ये जिल्ह्यासह महाराष्ट्रातून ८५ जणांनी भाग घेतला. रविवारी सकाळी ६ वाजता संगमेश्वर एसटी स्टॅंड येथे स्पर्धेचे उद्घाटन प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी श्रीफळ वाढवून केले. यावेळी सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी, निबंध कानिटकर, युयुत्सू आर्ते, सुहास ठाकुरदेसाई यांच्यासह सायकलिंग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. Cyclothon by Ratnagiri Cyclist Club
महामार्गावर स्पर्धा संपल्यानंतर देवळे गावात सायकलस्वार गेले. त्या वेळी कानडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावात सर्व सायकलस्वारांची वाजत गाजत मिरवणूक काढली. या वातावरणाने अवघे देवळे गाव सायकलमय झाले. बक्षीस वितरण समारंभ रंग अवधूत महाराज मठाच्या आवारात करण्यात आला. या वेळी नीलेश कोळवणकर, अॅड. प्रफुल्ल साळवी, गजानन काळोखे, उदय लोध, कौस्तुभ सावंत, सदाशिव करकरे, नामदेव सरपोतदार, वासुदेव सरदेसाई, मोघे गुरुजी, दिलीप लिंगायत, राजेंद्र मावळणकर, श्री. सरदेसाई, सुबोध करकरे, प्रबोध आठल्ये, युयुत्सू आर्ते, प्रमोद हर्डीकर, महेंद्र चाळके, रंजना कदम, भाई भोसले, अण्णा बेर्डे आदी उपस्थित होते. Cyclothon by Ratnagiri Cyclist Club

पहिल्या वर्षी सायक्लोथॉन हेदवी ते गणपतीपुळे, दुसऱ्या वर्षी रत्नागिरी ते चाफे कातळशिल्प आणि यंदा अध्यात्मिक प्रचारासाठी सायक्लोथॉन आयोजित केली. यंदाच्या स्पर्धेत वय वर्ष ११ ते ७२ या वयोगटातील महिला, पुरुषांनी भाग घेतला. सायकल गौरव पुरस्कार प्राप्त विनायक वैद्य यांनी सायक्लोथॉनमध्ये विशेष सहभाग घेत सर्वांना प्रोत्साहन दिले. दरवर्षीप्रमाणे दापोलीच्या प्रशांत पालवणकर यांनी गिअर सायकलिस्टना टक्कर देत नॉनगिअर सायकलने हे अंतर पार केले. विनोद केतकर यांनीही या स्पर्धेत साध्या सायकलवर भाग घेत यशस्वी सहभाग घेतला. Cyclothon by Ratnagiri Cyclist Club
स्पर्धेचे सुयोग्य नियोजन प्रसाद देवस्थळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सदस्यांनी चोख व्यवस्था ठेवल्याने स्पर्धकांनी खूप कौतुक केले. यशस्वीतेसाठी हॉटेल श्रद्धा धामणी, गोळवली गोशाळा प्रकल्प, इन्फिगो आय केअर हॉस्पीटल, राज मंडप डेकोरेटर्स, लायन्स क्लब रत्नागिरी, लायन्स क्लब संगमेश्वर, ओम प्रमोद ज्वेलर्स, आकार ऑर्गनायझेशन, कोकण प्रॉपर्टी एक्स्पो श्री. खामकर, प्राचीन कोकणचे वैभव सरदेसाई, जिल्हा शासकीय रुग्णालय, संगमेश्वर व साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र, युयुत्सू आर्ते, नीलेश चव्हाण, देवळे ग्रामपंचायत, गावप्रमुख, ग्रामस्थ यांचा समावेश होता. या स्पर्धेत चार हायड्रेशन पॉईंट ठेवले होते. तिथे पाणी व एनर्जी ड्रिंक, केळी, चिक्कीचे वितरण कार्यकर्त्यांनी केले. रुग्णवाहिका, सपोर्ट व्हेईकलची सुविधा उपलब्ध होती. सर्व स्पर्धा कोणत्याही अडचणीविना सुरेख झाली. Cyclothon by Ratnagiri Cyclist Club

सायकलदूत पुरस्काराने गौरव
यंदा प्रथमच सुवर्णसूर्य फाउंडेशनने सायकल प्रसार, प्रचार करणाऱ्या व्यक्तींना सायकलदूत नावाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. यामध्ये प्रसाद आलेकर, श्रद्धा रहाटे, गजानन भातडे, नीलेश शाह, प्रशांत पालवणकर आदींचा समावेश होता. तसेच डबल एसआर (सुपर रॅंडोनिअर) अमित कवितके यांचा गौरव केला. Cyclothon by Ratnagiri Cyclist Club
आलेकर बंधूंचे तिसऱ्या वर्षीही यश
पहिल्या वर्षीपासून सायक्लोथॉनवर आलेकर बंधूनी वर्चस्व गाजवले आहे. चिपळुणातील विक्रांत व प्रसाद या दोघा बंधूंनी तिन्ही वर्षे पहिला क्रमांक सोडला नाही. आजच्या स्पर्धेत आकाश व सांगलीच्या शिंदे यांनी आलेकर बंधूंसोबत सायकलिंग करत आव्हान दिले. परंतु अनुभवी व कसबी आलेकर बंधूंनी पहिला व चौथा क्रमांक या स्पर्धेत पटकावला. Cyclothon by Ratnagiri Cyclist Club
