• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूणच्या 2 महिलांची सायकलसवारी

by Manoj Bavdhankar
February 1, 2023
in Ratnagiri
124 1
0
Cycling by 2 women from Chiplun
244
SHARES
697
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सपोर्ट व्हेईकलविना 800 कि.मी. प्रवास, स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट

गुहागर, ता. 01 : चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्या डॉ. अश्विनी गणपत्ये, सौ. धनश्री गोखले या दोघींनी 800 कि.मि. सायकल प्रवास करुन स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. हा संपूर्ण प्रवास सपोर्ट व्हेईकलविना त्या दोघींनीच केला. असा प्रवास करणाऱ्या डॉ. अश्विनी गणपत्ये व सौ. धनश्री गोखले ह्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. Cycling by 2 women from Chiplun

हा प्रवास थरारक होता. सायकल चालवताना झोंबणारे गार वारे अंगावर घेत दररोज 150 कि.मी.चा टप्पा पार करणं आवाहनात्मक होतं. अनोळखी प्रदेशात, सपोर्टशिवाय वावरताना सुरक्षेविषयीची मनात किंतू होता पण प्रवासात संशय यावा अस काही घडलं नाही. आमची मुले आणि कुटुंबाच्या पाठींब्यामुळे हा प्रवास आम्ही यशस्वी करु शकलो. अशी प्रतिक्रिया आरोग्यमच्या संचालिक डॉ. अश्विनी गणपत्ये यांनी गुहागर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या.

Cycling by 2 women from Chiplun

चिपळूण सायकलिंग क्लबच्या डॉ. अश्विनी गणपत्ये, सौ. धनश्री गोखले या 20 जानेवारीला कारने ठाण्यात गेल्या. तेथून त्यांनी सायकल प्रवासाला सुरवात केली. पहिल्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता त्या वापीला थांबल्या. सुरवातीचा प्रवास असल्याने उत्साह होता. दुसऱ्या दिवशीच्या अंकलेश्र्वर पर्यंतच्या सायकल प्रवासात मात्र समोरुन येणारे वेगवान थंड वाऱ्यांनी त्रास दिला. त्यावेळी उर्जा टिकवून, वेगात सातत्य ठेवून, नियोजित टप्पा पूर्ण करण्याचे आव्हान होते. तिसऱ्या दिवशी या दोघी स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोचल्या. या परिसरात दोन दिवस थांबून त्यांनी स्थानिक जनतेशी संवादही साधला. परतीच्या प्रवासात मागून येणाऱ्या वाऱ्यांची साथ मिळाली. त्यामुळे पहिल्या दिवशी 160 कि.मी.चा टप्पा पार करता आला. Cycling by 2 women from Chiplun

Cycling by 2 women from Chiplun

या प्रवासाबाबत बोलताना डॉ. अश्विनी गणपत्ये म्हणाल्या की, यापूर्वी ग्रुपबरोबर अनेकवेळा सायकलींग केले होते. डॉ. तेजानंद यांच्याबरोबर गोव्यात गेले होते. त्यामुळे एकट्याने सायकलींग करण्याची भिती नव्हती. सुरक्षितता म्हणून प्रवासात नक्की कुठे जातोय हे कधीच सांगायचे नाही हे धोरण आम्ही आखले होते. त्याचबरोबर स्थानिक लोकांबरोबर संवादही साधत होतो. संपूर्ण प्रवासात भेटलेल्या अनेक मंडळींनी साह्य केले. एकता नगरमध्ये महिला रिक्षा चालकाशी गप्पा मारताना प्रकल्प उभारणीतील सर्व विस्थापितांना रोजगार मिळाल्याचे कळले. ती सर्व स्थानिक मंडळी स्टॅच्यू ऑफ युनिटी प्रकल्पामुळे समाधानी आहेत. हे ऐकून आनंद झाला. सायकल सवारीमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ खाण्यावरच आम्ही भर दिला होता. ग्रामीण भागात केवळ गुजराथी बोलीभाषा असल्याने किंचित अडथळा आला. हॉटेलला निवास करताना सायकलची काळजी वाटायची. पण महिला सायकलस्वार असल्याने हॉटेल मालक अधिक काळजी घेत होते. असे अनेक अनुभव या प्रवासाने आम्हाला दिले. Cycling by 2 women from Chiplun

Cycling by 2 women from Chiplun

रत्नागिरी जिल्ह्यातील इतका लांबचा प्रवास करणाऱ्या या दोघी पहिल्याच महिला आहेत. त्यामुळे मोहिमेवरुन 30 जानेवारीला चिपळूणला आल्यावर चिपळूण सायकल क्लबने त्यांचे जोरदार स्वागत केले. जिल्ह्यातील सायकल क्लबनी आणि सायकलस्वारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.  Cycling by 2 women from Chiplun

Cycling by 2 women from Chiplun
Tags: Cycling by 2 women from ChiplunGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share98SendTweet61
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.