• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वसुंधरा दिनानिमित्त दापोलीत सायकल फेरी

by Mayuresh Patnakar
April 25, 2023
in Ratnagiri
76 1
0
Cycle tour in Dapoli on Vasundhara day
149
SHARES
425
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 :   आपल्या एकुलत्या एक पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या जबाबदारीचे स्मरण करुन देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार दि. २३ एप्रिल २०२३ रोजी सायकल फेरी काढण्यात आली. यादरम्यान कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील अपारंपारिक ऊर्जा उद्यानाला भेट देऊन वसुंधरा आणि सौर ऊर्जेबद्दलची, उपकरणांची माहिती करुन घेण्यात आली. Cycle tour in Dapoli on Vasundhara day

Cycle tour in Dapoli on Vasundhara day

या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली, केळसकर नाका, बुरोंडी नाका, अपारंपारिक ऊर्जा उद्यान, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, छात्रालय, आझाद मैदान असा ६ किमीचा होता. Cycle tour in Dapoli on Vasundhara day

Cycle tour in Dapoli on Vasundhara day

अपारंपारिक ऊर्जा उद्यान येथे डॉ अतुल मोहोड, नितीन पालटे आणि सहकारी यांनी तेथील आधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे, नवीन प्रयोग बद्दल माहिती सांगितली. तसेच सौर जल शुद्धीकरण यंत्र, सौर उष्ण जल संयंत्र, सुटकेस सौर पेटी चुल, सुधारीत चुली, सौर कंदिल, उष्णता पुनर्प्राप्ती प्रणालीसह सुधारीत कुक स्टोव्ह, सौरचलित क्रिम विभाजक, भात पाखडणी सयंत्र, बायोगॅस सयंत्र, सौर टनेल वाळवणी यंत्र, कृषी अवशेष जैव वायु सयंत्र, जैव अवशेष ब्रीक्वेटिंग यंत्र, शेत तळे व ग्रीन हाऊस इत्यादी यंत्र दाखवली. Cycle tour in Dapoli on Vasundhara day

Cycle tour in Dapoli on Vasundhara day

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात केतन पालवणकर, अंबरीश गुरव, अमोद बुटाला, विनय गोलांबडे, राकेश झगडे, रागिणी रिसबूड, अक्षता साळवी इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर जास्त करा आणि ३० एप्रिल रोजी होणाऱ्या दापोली समर सायक्लोथॉन २०२३, सिझन ३ मध्ये सर्वांनी सहभागी व्हा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Cycle tour in Dapoli on Vasundhara day

Tags: Cycle tour in Dapoli on Vasundhara dayGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet37
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.