• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ सायकल फेरी संपन्न

by Guhagar News
January 23, 2023
in Health
74 1
0
Cycle round in honor of senior citizens
146
SHARES
416
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 : वृद्ध व्यक्तींची ज्येष्ठता व प्रदीर्घ अनुभव हा उपयुक्त गुण मानला जातो. या जेष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ दापोली सायकलिंग क्लब आणि द फर्न समाली रिसॉर्ट तर्फे रविवार २२ जानेवारी २०२३ रोजी सायकल फेरी काढण्यात आली. तसेच दापोलीतील गणेश दातार वृध्दाश्रमातील आजी आजोबांची भेट घेण्यात आली. Cycle round in honor of senior citizens

आझाद मैदानातून सुरु झालेली सायकल फेरी केळसकर नाका- बुरोंडी नाका- फॅमिली माळ- गणेश दातार वृध्दाश्रम- नटराज नाका- आझाद मैदान अशा ५ किमी मार्गावर झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. दातार वृध्दाश्रमामध्ये व्यवस्थापक रवींद्र इंगळे यांनी तेथील कार्याबद्दल माहिती सांगितली. यावेळेला ज्येष्ठ नागरिक संस्थेचे राजाराम मढव, सुरेश गुरव, प्रेमानंद महांकाळ आणि सहकारी उपस्थित होते. त्यांनी आजी आजोबा नातवंडे नात्याबद्दल माहिती दिली. नुकतेच विभागस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले विद्यार्थी यश शिर्के, स्नेहा भाटकर, संचिता भाटकर, सर्वेश बागकर, साईप्रसाद वराडकर, श्री खानविलकर, हर्ष लिंगावळे यांचा गौरव करण्यात आला. Cycle round in honor of senior citizens

Cycle round in honor of senior citizens

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात सुनिल रिसबूड, सर्वेश बागकर, संदीप भाटकर, विनय गोलांबडे, सुधीर चव्हाण, फर्न समाली रिसॉर्टचे दिनेश कुमार यादव इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. तसेच स्नेहसंध्या प्रतिष्ठानच्या शुभांगी गांधी, निलांबरी अधिकारी, स्मिता सुर्वे, रेखा बागुल आणि सहकारी यांचेही सहकार्य लाभले. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Cycle round in honor of senior citizens

Tags: Cycle round in honor of senior citizensGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share58SendTweet37
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.