जिल्ह्यातील पहिली संस्था ; पुस्तकांचे झाले प्रकाशन
गुहागर ता. 20 : स्वतःच्या शाळाचे अभ्यासक्रम निश्चित करून तो पुस्तक रुपात प्रकाशित करण्याचे काम कन्हैया प्ले स्कूल ने केले आहे. असा उपक्रम राबविणारे रत्नागिरी जिल्ह्यातील हे पहिलेच प्ले स्कुल आहे. Curriculum prepared by Kanhaiya Play School

लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर या संस्थेच्या गुहागर मधील कन्हैया प्ले स्कुलने प्ले ग्रुप ते सिनिअर के.जी. या चार वर्षांसाठी अभ्यासक्रम तयार केला. त्यासाठी मुलांचा वयोगटानुसार कसा विकास झाला पाहिजे यासाठी दिलेल्या मार्गदर्शक. दिशादर्शक माहितीचा अभ्यास केला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्ले ग्रुप काय करतात याचीही माहिती घेतली. या स्थानिक पालक, शिक्षक, बालतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ यांचा सल्ला घेण्यात आला. या सर्व माहिती चा उपयोग करून कन्हैया प्ले स्कूल ने चार गटांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. Curriculum prepared by Kanhaiya Play School

प्ले ग्रुपसाठी अक्षर, फळे व वेगवेगळ्या वाहनांची ओळख व्हावी यासाठी चिमुकल्या मुलांना आकर्षित करतील अशा रंगसंगती मध्ये तीन पुस्तके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय त्यांना खेळता येतील असे खेळही निश्चित करण्यात आले आहेत.
नर्सरीतील मुलांना लेखन कलेची व रंगांची ओळख व्हावी, बडबड गीते म्हणता यावीत असा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी कोणते उपक्रम घ्यावेत याचे स्वतंत्र पुस्तक आहे.
अशाच पद्धतीने ज्युनिअर व सिनियर के.जी. साठी अंकगणित, शब्द ओळख, सामान्य ज्ञान, आदी विषयांची पुस्तके आहेत.

या पुस्तकांचे प्रकाशन आज गुहागर मधील कन्हैया प्ले ग्रुपच्या शाळेत उद्योजिका सौ.संगीताताई भाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला साहिल आरेकर, माजी नगराध्यक्षा सौ.स्नेहाताई भागडे, गुहागर नगरपंचातीच्या शिक्षण सभापती सौ. सुजाताताई बागकर, महिला विभाग प्रमुख सौ.स्वातीताई कचरेकर, किड्स लाईफ प्ले स्कुलच्या अध्यक्ष सौ.आसावरी वराडकर हे मान्यवर उपस्थित होते. Curriculum prepared by Kanhaiya Play School

