• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण येथील उद्घाटनला अभिनेता ओंकार भोजने उपस्थिती

by Ganesh Dhanawade
January 18, 2023
in Ratnagiri
199 2
0
Cultural Food Festival at Chiplun
390
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. 5, 6, 7, 8 फेब्रुवारी 2023 दरम्यान लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सव

गुहागर, ता. 18 : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्यावतीने लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 5, 6, 7, 8 फेब्रुवारी 2023 दरम्यान संपन्न होणार आहे. खाद्य महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला लोककलांना जगभर पोहोचविणारा अभिनेता ओंकार भोजने याची खास उपस्थिती असणार आहे. ओंकार भोजने याने मंगळवारी सायंकाळी लोकमान्य टिळक वाचन स्मारक मंदिराला भेट दिली. या वेळी त्याला आयोजकांच्यावतीने प्रकाश देशपांडे यांनी त्याला लोककला महोत्सवाचे निमंत्रण दिले. Cultural Food Festival at Chiplun

पुढील महिन्यात रविवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांचा हस्ते पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. श्री जुना कालभैरव मंदिर ट्रस्ट अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानात हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी अभिनेता ओंकार भोजनेही उपस्थित राहाणार आहेत. अभिनेता ओंकार भोजने याची प्रमुख भूमिका असलेला सरला एक कोटी हा चित्रपट दि. 20 जानेवारीपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला लोटिस्माच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. Cultural Food Festival at Chiplun

लोकमान्य टिळक स्मारक वाचन भेटीवेळी कवी अरुण इंगवले, प्रा. संतोष गोनबरे, विनायक ओक, सुनिल कुलकर्णी, डॉ. साहील दाभोळकर, योगेश बांडागळे, प्रियदर्शनी मोहिते यांच्यासह लोटिस्माचे संचालक व साहित्यप्रेमी उपस्थित होते. Cultural Food Festival at Chiplun

Tags: Cultural Food Festival at ChiplunGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share156SendTweet98
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.