विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था
गुहागर, ता. 30 : विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (CSIR-NIO), दोना पौला रविवार, 1 जानेवारी 2023 रोजी स्थापना दिवस साजरा करणार आहेत. या निमित्ताने सकाळी 9.00 ते 11.30 या वेळेत संस्था जनतेसाठी खुले राहणार आहे. CSIR-NIO will remain open on 1 January
या संस्थेला भेट देऊन तेथील प्रवाळ परीसंस्थेची प्रतिकृती असलेले मत्स्यालय, संशोधन जहाजांच्या प्रतिकृती, समुद्र विज्ञान संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचे प्रदर्शन, तसेच समुद्र विज्ञानावरील चित्रपट आणि “करिअर इन ओशनोग्राफी” या विषयावरील चर्चासत्र यांचे आयोजन केले आहे. संस्थेने सर्व अभ्यागतांचे स्वागत असल्याचे म्हंटले आहे. दुपारी 15.30 वाजता एनआयओ च्या सभागृहात ख्यातनाम शास्त्रज्ञ आणि अंतराळ विभागाचे सचीव, अंतराळ आयोगाचे अध्यक्ष आणि इस्त्रो (ISRO) चे अध्यक्ष सोमनाथ एस यांचे “जागतिक संदर्भात अवकाशाची नवी परिभाषा” या विषयावर जाहीर व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे. CSIR-NIO will remain open on 1 January
सोमनाथ यांची जवळजवळ 36 वर्षांची दिमाखदार कारकीर्द असून त्यांनी अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सोमनाथ हे प्रक्षेपण वाहनांच्या अभियांत्रिकी प्रणाली क्षेत्रातील तज्ञ आहेत. 2018 मध्ये, इस्त्रोचे प्रमुख केंद्र असलेल्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक म्हणून, त्यांनी वाहन तंत्रज्ञान विकास सुरु करण्याची जबाबदारी उचलली. त्यांच्या नेतृत्वाखाली, व्हीएसएससीने पॅड अॅबॉर्ट टेस्ट (पीएटी) द्वारे क्रू एस्केप सिस्टम प्रात्यक्षिक, जीएसएलव्ही एमके-III एम1/चांद्रयान 2 चे प्रक्षेपण यासारखे महत्वाचे पराक्रम नोंदवले आहेत. आगामी गगनयान मोहीम आणि छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणाचे वाहन, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV), च्या विकासाचे ते नेतृत्व करत आहेत. CSIR-NIO will remain open on 1 January

चर्चा सत्रामध्ये अवकाश क्षेत्रातील उदयोन्मुख जागतिक परिस्थिती आणि भारतातील अंतराळ क्षेत्राशी असलेला त्याचा संबंध याच्या अनेक पैलूंवर भर दिला जाईल. CSIR-NIO will remain open on 1 January चर्चा सत्रात अवकाशातील उदयोन्मुख जागतिक परिस्थिती आणि भारतातील अंतराळ क्षेत्राशी असलेला त्याचा संबंध, याबाबतच्या अनेक पैलूंवर लक्ष दिले जाईल, जसे लहान रॉकेटची उभारणी, लहान उपग्रहांची निर्मिती आणि अवकाश-आधारित अनुप्रयोग, जे एनजीई द्वारे केले जात होते. CSIR-NIO will remain open on 1 January

