• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी महामार्गाला सीआरझेडीची मंजुरी

by Mayuresh Patnakar
August 14, 2023
in Bharat
490 4
1
CRZ approval for Marine Highway

रेवस रेड्डी महामार्गही चार पदरी होणार

961
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दाभोळ मधील कासव संवर्धन वाचविण्यासाठी प्रयत्न

गुहागर, ता. 14 : रेवस रेड्डी सागरी महामार्गामधील रत्नागिरी जिल्ह्यातील टप्पा 2 ला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) ने मंजुरी दिली आहे. दाभोळ खाडीतील पुलाच्या बांधकामामुळे दाभोळ किनारपट्टीवरील कासव संवर्धनाला धोका संभवतो. तो टाळण्यासाठी विविध उपाययोजनांची शिफारस एमसीझेडएमएने केली आहे. तसेच या चार पदरी महामार्गामुळे चार हेक्टर खारफुटीचे आणि सहा हेक्टर आंतरभरती क्षेत्राचे नुकसान होईल. असेही एमसीझेडएमएने नमूद केले आहे. CRZ approval for Marine Highway

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) दोन पदरी रेवस रेड्डी सागरी महामार्गाचे (MSH-4) चार पदरी विस्तारीकरण केले जात आहे. यामधील रत्नागिरी जिल्ह्यातील टप्पा 2 मधील महामार्ग बाणकोटपासून सुरु होवून मंडणगड, दापोली, गुहागर तालुक्यातून खाडीमार्गे जयगडपर्यत आहे. या टप्प्यामध्ये दाभोळ खाडी व जयगड खाडीमधील दोन पुलांचा समावेश आहे. या टप्प्यामध्ये वेळास, केळशी, आंजर्ले, दाभोळ, गुहागर, तवसाळ येथील कासव संवर्धनाचे क्षेत्र येते. त्यापैकी केळशी समुद्रकिनारी कासवांच्या घरट्याची जागा नियोजीत महामार्गापासून केवळ ५० मीटर अंतरावर आहे. वेळास येथील घरट्यांची जागा 130 मीटर अंतरावर तर आंजर्ले घरट्यांची जागा 210 मीटर दूर आहे. गुहागर व तवसाळ येथील कासव संवर्धन क्षेत्रापासून सागरी महामार्ग पुरेसा दूर आहे. मात्र दाभोळ येथील महामार्गाचे आरेखनातील प्रस्तावित पूल थेट कासवांच्या घरट्यावरुन जात आहे. CRZ approval for Marine Highway

त्यामुळे महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) ने रत्नागिरी टप्पा 2 ला मंजुरी देताना दाभोळ येथील पुलाचे बांधकामातील दोन खांबांमधील अंतर 150 मीटरपेक्षा जास्त असावे. पुलाचे बांधकाम ऑक्टोबर ते मार्च दरम्यान कासवांच्या घरट्याच्या हंगामात केले जाऊ नये. बांधकाम क्षेत्रातील आवाजाचे नियमन करावे. कासव संवर्धन क्षेत्रातील महामार्गाचे बांधकाम करण्याबाबत कांदळवन प्रतिष्ठानशी सल्लामसलत करावी. असे म्हटले आहे.  CRZ approval for Marine Highway

एमएसआरडीसीने सादर केलेल्या कागदपत्रांनुसार सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सागरी महामार्ग कुणकेश्र्वर समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या प्रवाळ खडक, मालवण येथील सागरी अभयारण्याच्या इको-सेन्सिटिव्ह बफर झोन व मिठमुंबरी येथील वाळूच्या ढिगाऱ्यांमधून जात आहे. त्याचप्रमाणे तारामुंब्री, नारिंगी, आचरा, कर्ली, मोचमाड या पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या नद्यांमधुन जात आहे. त्यामुळे सागरी महामार्गाच्या या टप्प्याला अजूनही सीआरझेडीची परवानगी मिळालेली नाही. CRZ approval for Marine Highway

दरम्यान चार पदरी सागरी महामार्गामुळे मुंबई गोवा महामार्गाला पर्याय उपलब्ध होईल. या महामार्गामुळे मंडणगड, दापोली, गुहागरमधील पर्यटन व्यवसायाला गती मिळेल. वाहतुक वाढल्यामुळे अन्य उद्योगव्यवसायही वाढतील. असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आपल्या प्रस्तावात नमुद केले आहे. CRZ approval for Marine Highway

Tags: CRZ approval for Marine HighwayGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMarine HighwayNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share384SendTweet240
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.