गुहागर चौपाटीसह सर्व पर्यटन स्थळांवर गर्दी
गुहागर, ता. 07 : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून नावारूपास येत असलेले गुहागर उन्हाळी सुट्यांमुळे बहरले आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरलेली दिसत आहेत. Crowd of tourists due to school and college holidays
दरवर्षी पर्यटक गुहागरमध्ये शाळा व महाविद्यालयाच्या परिक्षा संपल्यानंतर मोठी गर्दी करतात. तालुक्यात या पर्यटन हंगामात दिवसाला हजारो पर्यटक येत असतात. गुहागर हे सुरक्षित ठिकाण असल्याने सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. दरवर्षी पर्यटकांच्या या वाढलेल्या संख्येमुळे कोरोना महामारीनंतर गुहागरातील पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. गेली दोन वर्ष गुहागरच नव्हे तर राज्यातील सर्वच पर्यटन व्यवसायावर कोरोनाचे संकट कोसळले होते. लॉकडाऊनमुळे तालुक्यातील हॉटेल, लॉज व घरगुती राहण्याच्या ठिकाणांना कोरोना महामारीचा मोठा फटका बसला होता. Crowd of tourists due to school and college holidays
निसर्ग सौंदर्याबरोबरच लांबलचक समुद्र चौपाटी लाभलेल्या गुहागरची ओळख राष्ट्रीय पातळीवर केव्हाच पोहोचली आहे. प्राचीन मंदिरासह प्रेक्षणिय पर्यटन स्थळांमुळे पर्यटक दरवर्षी मोठया संख्येने येत असतात. वर्षातून नाताळ सुट्टी व ३१ डिसेंबरला गुहागर पर्यटकांनी फुल्ल होऊन जातो. तर आता मुलांच्या परिक्षा झाल्यानंतर शाळ महाविद्यालयाच्या सुट्ट्यामुळे व कडाक्याच्या उन्हामुळे मुंबई, पुणे व अन्य ठिकाणचे पर्यटक कोकणात धाव घेतात. Crowd of tourists due to school and college holidays
तालुक्यात सुमारे ५६ हॉटेल, ३५ एमटीडीसी निवासस्थाने व ७५ घरगुती निवास आणि राहण्याची व्यवस्था आहे. पूर्वी गृहागरला धावती भेट देऊन जाणारा पर्यटक दोन वर्षाचा कोरोना काळ वगळता आता सलग तीन दिवस वास्तव्य करु लागला आहे. एवढेच नव्हे तर गुहागरात राहून आता गणपतीपुळे व दापोलीतील पर्यटन स्थळे पाहून पुन्हा गुहागरात येऊ लागला आहे. ही येथील पर्यटन सोयी सुविधामूळे शक्य झाले आहे. बहुचर्चित एरॉनचा दाभोळ पॉवर प्रकल्प बंद पडल्यानंतर बेरोजगारीचे मोठे संकट तालुक्यावर आले होते. अशा परिस्थितीत निसर्गसौंदर्याने नटलेल्या पर्यटनाने येथील जनतेला रोजगार उपलब्ध करुन दिला. Crowd of tourists due to school and college holidays
या सुट्टीमुळे गुहागर चौपाटी, समुद्रातील बोटीग, घोडेस्वार, उंट सफरी, खाद्य पदार्थांचे स्टॉलवर गर्दी पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. परचुरी खाडीमध्ये सत्यवान दर्देकर यांनी कोकणातील पहिलीच हाऊसबोट सुरू केली असून या सेवेला देखील पर्यटक पसंती देत आहेत. दाभोळ – धोपावे फेरीबोट, तवसाळ – जयगड फेरीबोटीबरोबरच डॉ. चंद्रकांत मोकल व डॉ. योगेश मोकल यांनी याच परचूरी खाडीमध्ये काही दिवसांपूर्वीच फेरीबोट सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आलेला पर्यटक केवळ गुहागर शहरामध्येच न राहता तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विखुरला गेला आहे. तालुक्यात असगोली येथे द वूड, पालशेत समुद्रकिनारी गाज, मोडकाआगर येथे शांताई रिसॉर्ट, शृंगारतळी मध्ये हॉटेल हेमंत आदी ठिकाणी राहण्याच्या सुसज्ज अशा व्यवस्था आहेत. Crowd of tourists due to school and college holidays