१०७० कोटींचा घोटाळा
गुहागर, ता. 18 : सरकारला मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ९०,००० पगारदार वर्गाने (सरकारी आणि खाजगी कंपन्यांमध्ये काम करणार्या) त्यांचे कर सवलतीचे दावे चुकीच्या पद्धतीने भरले आहेत. या दाव्यांची एकूण रक्कम १,०७० कोटी रुपये आहे. तपासादरम्यान, आयकर विभागाला आढळून आले की, लोक त्यांच्या कर रिटर्नमध्ये कलम 80C, 80D, 80E, 80G, 80GGB, 80GGC अंतर्गत चुकीच्या कपातीचा दावा करत आहेत. त्यामुळे सरकारला मिळणारा आयकर कमी होत आहे. Crore scam in income tax department department
द इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सूत्रांनी दावा केला की, तपासादरम्यान असे आढळून आले की, असे अनेक पगारदार कर्मचारी आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू), मोठ्या कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, एलएलपी कंपन्यांमधील कर्मचार्यांचा समावेश आहे. याशिवाय ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने कपातीचा दावा केला होता असे बरेच कर्मचारी एकाच कंपनीत काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे. सरकारी विभागाच्या विश्लेषणातून करदात्यांनी ITR मध्ये दावा केलेल्या कलम 80GGB/80GGC अंतर्गत एकूण कपात आणि ITR मध्ये असलेली एकूण रक्कम यामध्ये खूप फरक आहे. कलम 80C, 80E, 80G अंतर्गत दावा केलेल्या कपातींमध्येही तफावत असल्याचे दिसून आले आहे. कर विभाग कलम 80E, 80G, 80GGA, 80GGC आणि इतर कपाती अंतर्गत बनावट कपातीचा दावा केल्याचा संशय असलेल्या सर्व कर्मचार्यांवर कारवाई करण्याची शक्यता आहे. Crore scam in income tax department department


काही लोक करमाफी किंवा परतावा मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करत असल्याचे सरकारच्या लक्षात आले. त्यामुळे सरकार आता कंपन्यांना जागरूक करत आहे. टॅक्स रिटर्नमध्ये चुकीची माहिती दिल्याने काय तोटे होऊ शकतात, याची माहिती सरकारकडून सांगण्यात येत आहे. चुकून कोणी चुकीची माहिती दिली असेल तर ती दुरुस्त कशी होणार? याबद्दल सरकार करदात्यांना माहिती देत आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुमारे ९०,००० करदात्यांनी त्यांच्या खढठ मधील कर कपातीचे चुकीचे दावे मागे घेतले आहेत. त्याची एकूण रक्कम सुमारे १,०७० कोटी रुपये आहे आणि त्यांनी अतिरिक्त करही भरला आहे. Crore scam in income tax department department