दि. 30 व 31 डिसेंबर रोजी वेळंब नालेवाडी येथील मैदानावर
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाज यांच्या वतीने गुरव प्रीमियर लीग पर्व तिसरे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक 30 डिसेंबर ते रविवार दिनांक 31 डिसेंबर असे दोन दिवस वेळंब नालेवाडी येथे घेतल्या जाणार आहेत. Cricket Tournament organized by Gurav Samaj
या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला पंधरा हजार व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला दहा हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच खास आकर्षण म्हणजे सामनावीर मेडल, मालिकावीर आकर्षक चषक, बॅट, टी शर्ट, व मेडल उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक, टी-शर्ट व मेडल, उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक, टी-शर्ट व मेडल देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी वेळंब नालेवाडी येथील मैदानावर होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेचे क्रीडा रसिकांनी आनंद लुटावा, असे आवाहन हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे. Cricket Tournament organized by Gurav Samaj