महापुरूष आयोजन ; राजा हिंदुस्तानी कोतळूक उपविजेता
गुहागर, ता.17 : शहरातील पोलिस परेड ग्राऊंडवर महापुरूष सांस्कृतिक, कला व क्रिडा मंडळ गुहागर यांच्या वतीने भव्य पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 12 ते 14 ऑगस्ट रोजी घेण्यात आल्या. या क्रिकेट स्पर्धेत महापुरुष संघाने राजा हिंदुस्तानी, कोतळूक संघाचा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले. तालुक्यातील ३1 संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. Cricket tournament in Guhagar


सलग तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेचे उत्तम नियोजन महापुरूष सांस्कृतिक, कला व क्रिडा मंडळ गुहागरने केले होते. स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या महापुरूष संघानेच प्रथम पारितोषिक रोख रक्कम 11111/- व आकर्षक चषक मिळवून विजेतेपद पटकावले आहे. तर कोतळूक येथील राजा हिंदुस्तानी संघाने रोख रक्कम 6666/- व आकर्षक चषक मिळवून उपविजेते पद पटकावले. अंतिम सामन्यातील सामनावीर व उत्कृष्ट फलंदाज म्हणून यश लोखंडे याला गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट गोलंदाज, दिपू जाधव. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, कुणाल देसाई व मालिकविर,ओंकार बागकर यांना चषक देऊन गौरविण्यात आले. महापुरुष संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 ओव्हर मध्ये 56 रन केल्या होत्या. Cricket tournament in Guhagar

