गुहागर महापुरुष संघ विजेता तर श्री खेम वरदान पालपेणे संघ उपविजेता
गुहागर, ता. 18 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र चषक २०२४ मनसेच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी आयोजित क्रिकेट स्पर्धा जानवळे फाट्या समोरील गोल्डन पार्क येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत महापुरुष गुहागर संघ विजेता ठरला असून श्री खेम वरदान पालपेणे, गुहागर संघ उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण १६ संघानी सहभाग घेतला होता. Cricket Tournament by MNS
या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या शुभ हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज यश लोखंडे महापुरुष गुहागर, उत्कृष्ट गोलंदाज शंतनू घाणेकर श्री खेम वरदान पालपेणे, मालिकावीर राज डोर्लेकर, महापुरुष गुहागर यांना समान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. Cricket Tournament by MNS


बक्षीस वितरण कार्यक्रमाला मनसेचे उत्तर जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, माथाडी कामगार संघटना राज्य सरचिटणीस प्रविण काणेकर, शाहीर शाहिद खेरटकर, सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी, ,सुरेंद्र निकम, सुजित गांधी, उप तालुकाध्यक्ष अमित खांडेकर, जितेंद्र साळवी, सचिन गडदे, विभाग अध्यक्ष विश्वजीत पोतदार, स्वप्निल कांबळे, रानवी ग्रामपंचायत सदस्य सुहास चौगले, विवेक जानवळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी स्टायलिश पंच म्हणून अमित खांडेकर, प्रीतम सुर्वे, विवेक नवरत यांनी काम पाहिले. तर समालोचन विक्रांत टेरवकर, नितीन महाडीक यांनी केले. या स्पर्धेचे यूट्यूब च्या माध्यमातून लाईव्ह प्रसारण करण्यात आले होते. यासाठी सारसी इव्हेंट, श्रृंगारतळी यांनी सहकार्य केले. Cricket Tournament by MNS


यावेळी गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी सांगितले की, तालुक्यातून सर्व खेळाडू ज्याप्रमाणे क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येतात त्याचप्रमाणे गुहागरच्या विकासासाठी सुद्धा एकत्र येऊन सर्व युवकांची ताकद आमच्या पाठी द्या, विकासाच्या महापर्वामध्ये सामील व्हा, गुहागरच्या विकासाला हातभार लावा, अशी भावनिक साद त्यांनी दिली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हा विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या सर्व मनसेचे तालुका पदाधिकारी व मनसे सैनिक यांनी विशेष मेहनत घेतली. Cricket Tournament by MNS