गुहागर, ता. 10 : क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था क्रिडा विभाग आयोजित धारपवार चषक क्रिकेट स्पर्धेचं पहिल पर्व पवन तलाव, चिपळूण येथे उत्साहात पार पाडल्या. यावेळी संस्थापक अध्यक्ष ॲड. राजन पवार, क्रिडा विभाग अध्यक्ष प्रदीप पवार तसेच संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी, मान्यवर व धारपवार परिवारातील कुटुंबिय उपस्थित होते. Cricket tournament by Dharpawar Charitable


या स्पर्धेत सिंहगड चॅलेंजर्स, भैरी भवानी, मालघर, चिपळूण, रत्नागिरी संघ विजेता तर पालगड लायन्स, त्रिवेणी स्पोर्ट्स क्लब, गावतळे, दापोली रत्नागिरी संघ उपविजेता ठरला. स्पर्धेसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील १५० खेळाडूंनी नोंदणी केली व ८ संघानी सहभाग घेतला. सहभागी संघाना सिंधुदुर्ग वॉरियर्स, रायगड योध्दा, पालगड लायन्स, प्रचितगड फायटर्स, गोपाळगड सुभेदार, शिवनेरी सुपरकिंग्ज, सिंहगड चॅलेंजर्स, तोरणा टायगर्स अशी गडकिल्ल्यांची नावे देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. Cricket tournament by Dharpawar Charitable चिपळूण मधील विश्वस्त, पदाधिकारी व पवार आळी मधील सर्वं बंधू भगिनी, सर्वांनी केलेले मोलाचे सहकार्य यामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. अशाचप्रकारे दरवर्षी ही स्पर्धा वेगवेगळ्या विभागात आयोजित करुन सर्वांना एकत्र आणून तरुणांना प्रोत्साहन देण्याचा मानस मान्यवरांनी व्यक्त केला. Cricket tournament by Dharpawar Charitable