फ्रेंड सर्कल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ; खेळाडूंसाठी बक्षिसांची लयलूट
गुहागर, ता. 20 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दिनांक २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत कै. वैभव विजय आरेकर, कै. सुधर्मा मदन आरेकर, कै. संजय सुरेश वराडकर, कै. भार्गव मारुती आरेकर, कै. विलास अनाजी वराडकर यांच्या स्मृती चषक भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Cricket tournament begins at Khalchapat


या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला २१ हजार व चषक, तर उपविजेत्या संघाला १५ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच खास आकर्षण म्हणजे मालिकावीर खेळाडूस ट्रॅक सूट, सामनावीर टी शर्ट, फलंदाज बॅट, गोलंदाज शूज, क्षेत्ररक्षक गॉगल, षटकार किंग हेडफोन, प्लेअर ऑफ द डे स्मार्ट वॉच दिले जाणार आहे. तरी गुहागर खालचापाट येथील मैदानावर होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेचे क्रीडा रसिकांनी आनंद लुटावा, असे आवाहन फ्रेंड सर्कल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. Cricket tournament begins at Khalchapat

