महापुरूष आयोजन ; 22 ते 26 मार्च 2023 रोजी होणार स्पर्धा
गुहागर, ता.17 : शहरातील पोलिस परेड ग्राऊंडवर भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा महापुरूष सांस्कृतिक, कला व क्रिडा मंडळ गुहागर यांच्या वतीने आयोजित केल्या आहेत. Cricket Tournament at Police Ground
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक संघानी दि. 19/03/2023 पर्यंत महापुरूष क्रिडा मंडळाकडे नाव नोंदणीची करावयाची आहे. प्रत्येक संघातील खेळाडू हे एकाच ग्रामपंचायत/नगरपंचायत मधील असावेत. त्यासाठी येताना तसे पुरावे घेऊन यावेत. (आधार कार्ड, इलेक्शन कार्ड इत्यादी). अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धा 22 ते 26 मार्च 2023 या कालावधीत खेळवल्या जाणार आहेत. क्रिकेट स्पर्धांची प्रवेश फी 1500/- असून बाँल फि रु. 100 /- आहे. स्पर्धेचे इतर नियम व अटी स्पर्धेच्या ठिकाणी सांगण्यात येतील. तरी जास्तीत जास्त संघाने सहभागी होण्याचे आवाहन, महापुरूष सांस्कृतिक, कला व क्रिडा मंडळ गुहागर यांच्या वतीने करण्यात आले आहे. Cricket Tournament at Police Ground


या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15001/- व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10001/- व आकर्षक चषक, तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर, क्षेत्ररक्षक चषक ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धा पाहण्याची संधी क्रीडा रसिकांना मिळणार आहे. Cricket Tournament at Police Ground
नाव नोंदणी ठिकाण व संपर्क क्रमांक
कल्पेश बागकर – 9421272726
यश लोखंडे – 8530623815
प्रतिक मोहिते – 7057894212
शुभम भायनाक – 8554825992
राकेश राऊत – 8087114705
महेश भोसले – 7770044377

