राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित स्पर्धेमध्ये ३२ संघांचा सहभाग
गुहागर, ता. 06 : राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी वतीने टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कै मारूती बंधू आडाव स्मृती चषक (पर्व तिसरे) रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत मर्यादित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दि. 05 जानेवारी रोजी सरपंच सौ. प्रगती मोहिते फित सोडून तर प्रमुख मानकरी नंदकुमार नार्वेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. Cricket tournament at Kotaluk Udamewadi
गुहागर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये ३२ संघांनी सहभाग घेतला आहे. मंडळाच्या वतीने सलग २३ व्या वर्षी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख रक्कम ३३ हजार, उपविजेत्या संघास रोख रक्कम २२ हजार व आकर्षक चषक तसेच वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा समारोप रविवार दिनांक ८ जानेवारी रोजी होणार आहे. Cricket tournament at Kotaluk Udamewadi


स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सरपंच प्रगती मोहिते, उपसरपंच शितल गोरिवले, प्रमुख मानकरी नंदकुमार नार्वेकर, ना. गोपाळकृष्ण गोखले विदयालय कोतळूक मुख्याध्यापक बनसोडे सर, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन ओक, सचिन भेकरे, सुनिल आगिवले, कोतळूक सोसायटी संचालक सोनू पाष्टे, गोरिवलेवाडी अध्यक्ष यशवंत निवाते, गंगाराम बारगोडे, आबा आरेकर, मंडळाचे अध्यक्ष उल्हास आरेकर, किसन बारगोडे, उदमेवाडी अध्यक्ष समीर ओक, उपाध्यक्ष नरेश बागकर, गुहागर क्रिकेट असोसिएशनचे सचिव कैलास पिलणकर, समीर आरेकर, वैभव बागकर, गणेश बागकर, मंदार गुहागरकर, अमोल बेलवलकर, आशिष आरेकर, अनिल आरेकर, अनिकेत आरेकर, आदींसह मंडळाचे सर्व सदस्य, क्रिडा प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. Cricket tournament at Kotaluk Udamewadi

