विजेता रॉयल फ्रेंड्स कोथळुक तर उपविजेता सागर पुत्र असगोली
गुहागर, ता. 05 : स्वयंप्रकाश गोयथळे व मोरे मंडळ गुहागर खालचा पाट यांच्या वतीने रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत रॉयल फ्रेंड्स कोथळुक संघाने विजेतेपद पटकावले. तर सागर पुत्र असगोली संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. Cricket tournament at Khalchapat
या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला 2 हजार दोन व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला एक हजार एक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून आशुतोष लाकडे, उत्कृष्ट गोलंदाज वेदांत कावणकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विघ्नेश जांभारकर, सामनावीर साईराज बडोते व मालिकाविर म्हणून आर्यन शिगवण यांची निवड करण्यात आली. Cricket tournament at Khalchapat
या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी दिलीप गोयथळे, नंदकुमार पाटील, माजी नगरसेवक अमोल गोयथळे, राकेश गोयथळे, महेंद्र पाटील, संतोष गोयथळे, विद्याधर गोयथळे, राजेश गोयथळे, उमेश गोयथळे, समील मोरे, अमोघ पाटील, जितेंद्र गोयथळे, योगेश गोयथळे, दिगंबर गोयथळे, नयन गोयथळे, मनोहर गोयथळे, वैभव गोयथळे, तनय गोयथळे, ऋषिकेश गोयथळे, गणेश गोयथळे, विश्वास गोयथळे, भरत गोयथळे, सुधीर नागवेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा संपन्न होण्यासाठी यथार्थ मोरे, स्पर्श गोयथळे, अद्वेत पडवळ, राज नागवेकर, रुद्र पावसकर, विघ्नेश आरेकर, अनुज साळवी यांनी मोलाचे योगदान दिले. Cricket tournament at Khalchapat