गुहागर क्षत्रिय मराठा समाज संघटनेतर्फे दि. १६ व १७ रोजी आयोजन
गुहागर, ता. 06 : क्षत्रिय मराठा समाज संघटना गुहागरच्या वतीने दि. १६ व १७ मार्च रोजी मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे जानवळे फाटा समोरील मैदानात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १२ संघ सहभागी होणार आहेत. Cricket tournament at Janwale Phata
तालुक्यातील मराठा समाजातील युवकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. तालुक्यातील मराठा समाजातील युवकांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचा प्रयत्न होत आहे. यावेळी तालुक्यातील इतर समाजातील प्रमुख पदाधिकारी तसेच गुणवंतांचा सन्मान मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. मराठा प्रिमियर लीग स्पर्धेचे हे दुसरे पर्व आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५५ हजार ५५५ रुपये, व्दितीय पारितोषिक ३३ हजार ३३३ रुपये, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकावीर, शिस्तबध्द संघ यांना गौरविण्यात येणार आहे. Cricket tournament at Janwale Phata

या मराठा प्रीमियर लीग मध्ये १२ संघ सहभागी होणार आहे. यामध्ये वीर मराठा कौढर काळसुर (संघमालक सचिन गुजर), श्रीयान स्ट्रायकर्स कारुळ (संघ मालक मनीष जोशी ऋषिकेश जोशी), जय सोनसाळवी इलेव्हन ऍग्रो जामसुत (संघ मालक प्रकाश साळवी),भैरीबुवा वॉरियर्स, झोंबडी अवधुत सकपाळ, आशिष सकपाळ, मोरेश्वर, पिंपर (संघमालक निखिल मोरे) ग्रेट मराठा वॉरिअर्स, पालपेणे (संघमालक प्रदीप आयरे, साहिल महाडीक ), अधिराज वॉरिअर्स शृंगारतळी,(संघमालक संदेश बाबर) निलअर्णव इलेव्हन शृंगारतळी (संघमालक अमिष कदम, महेश तांबे), स्वामी समर्थ चिखली (संघमालक अमित साळवी, विराज साळवी), सिध्दी विनायक, वरवेली (संघमालक आशिष विचारे, कुणाल विचारे) इलेव्हन मराठा वॉरिअर्स गिमवी (संघमालक संतोष आयरे), बुल रायडर्स पाटपन्हाळे, (संघमालक संदेश चव्हाण, मनीष चव्हाण) आदी सहभागी होणार आहेत. Cricket tournament at Janwale Phata
या स्पर्धेला विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. मराठा समाजाला एकत्र करुन तालुक्यात साकारणारे मराठा भवन याचीही माहिती देण्यात येणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमिश कदम, ॲड. संकेत साळवी, निखिल साळवी, जय शिर्के, दिनेश कदम, अजय खाडे, आशिष विचारे, मंगेश कदम, विराज सकपाळ, कुणाल देसाई, शैलेश पवार, सुयोग विचारे, प्रकाश साळवी, सर्वेश साळवी, संदेश साळवी, मंगेश जोशी यांच्यासह समाजातील पदाधिकारी व युवा वर्ग मेहनत घेत आहेत. Cricket tournament at Janwale Phata
