आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सवात व्याख्यान
रत्नागिरी, ता.14 : गेल्या दहा वर्षांचे उत्पादन बघता जिल्ह्यात बांगडा, तारली यांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. टायनी कोळंबीचे उत्पादन वाढत आहे. आपल्या खाड्यांची स्थिती वाईट आहे. कारण सर्व खाड्या प्लास्टिकच्या प्रदूषणाने भरल्या आहेत. तेथे जलचर जगू शकत नाहीत. निवड पद्धतीने उद्दिष्ट ठेवून मासेमारी करायला हवी आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. केतन चौधरी यांनी केले. Creeks in the district are filled with plastic
आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सवात डॉ. चौधरी यांनी व्याख्यान दिले. मासेमारीचे व्यवस्थापन सांगताना त्यांनी योजना, उद्दिष्ट, माहितीचे संकलन, विश्लेषण, अमलबजावणी याविषयीचे मुद्दे सांगितले. यावेळी आसमंतचे संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी डॉ. चौधरी यांचा सत्कार केला. व्याख्यानानंतर अनेकांनी शंका विचारल्या. त्यांना डॉ. चौधरी यांनी समर्पक उत्तरे दिली. Creeks in the district are filled with plastic

डॉ. चौधरी म्हणाले की, मत्स्योत्पादनात घट होऊ लागली आहे. आता नौकांची संख्या भरपूर व माशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे हळुहळू काही जातींचे मासे मिळेनासेच होणार आहेत. मासेमारी व्यवस्थापनातील त्रुटी सांगताना नियमांच्या अवलंबनाची अनास्था, कमतरता आणि शास्त्रज्ञांचा दृष्टिकोन दुर्लक्षित केला जातो. मासेमारी नौकांची संख्या व जाळ्यांची क्षमता नियंत्रित करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आषाढी ते कार्तिकी एकादशी, चतुर्थी, अमावस्या पौर्णिमेला मासेमारीस बंदी होती. यामुळे पुरेशा प्रमाणात मासे उपलब्ध होते. फक्त किनारपट्टीवर मच्छीमारी न करता खोल समुद्रात जायला हवे. सागरी उद्यान, सागरी अभयारण्ये उभारली पाहिजेत. परदेशाप्रमाणे ठराविक उत्पादन घेतले की मासेमारी बंद करण्याची पद्धत हवी. जाळ्यात अडकलेले छोटे मासे सोडणारे संयंत्र सबसिडीतून मच्छीमारांना दिले पाहिजे. खवय्यांनी जिभेचे चोचले पुरवताना ठरावीकच मासे न खाता अन्य माशांचीही मागणी केली पाहिजे. Creeks in the district are filled with plastic

भारतीय पर्यावरण आणि मासेमारीची परिस्थिती सांगताना डॉ. चौधरी यांनी मुद्देसूद मांडणी केली. अनेक जातीचे मासे, अनेक प्रकारची जाळी, एकाच प्रकारच्या जाळ्यात अनेक जातीचे मासे, विविध जातीच्या माशांचे वेगवेगळ्या वेळी प्रजनन, एकाच प्रकारच्या माशांचे वर्षात अनेक वेळा प्रजनन होते. पर्यावरणाचा अचूक समतोल आणि समुद्रातील पर्यावरणाचा असमतोल त्यांनी मांडला. Creeks in the district are filled with plastic

