रत्नागिरी, ता. 24 : भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात सृजनोत्सव रंगला. सृजन युवा करंडक द्वितीय व तृतीय वर्ष वाणिज्य शाखेने जिंकला. सृजन युवा करंडक उपविजेतेपद प्रथम वर्ष वाणिज्य शाखेने पटकावले. सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग व आयक्यूएसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने सृजनोत्सवाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले. यात विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा झाल्या. Creation festival at Dev, Ghaisas, Keer college
सृजनोत्सवाची सुरवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. भारत शिक्षण मंडळाचे सचिव सुनील तथा दादा वणजू यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले. या वेळी उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे उपस्थित होते. उपाध्यक्ष डॉ. अलिमिया परकार यांच्या हस्ते सृजनोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वैभव कीर यांनी प्रास्ताविकातून सृजनोत्सवातील विविध कार्यक्रम व स्पर्धा याची माहिती दिली. उपप्राचार्या वसुंधरा जाधव यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. Creation festival at Dev, Ghaisas, Keer college
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन इत्यादी कलाविष्कार सादर केले. सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरणाला प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष डॉ. परकार, कार्यकारिणी सदस्य विजय वाघमारे उपस्थित होते. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी सृजनोत्सवमधील कार्यक्रमाचा आढावा घेतला. गोल्डन बॉय हा किताब दुर्गेश जाधव (द्वितीय वर्ष वाणिज्य) व गोल्डन गर्ल श्रावणी चव्हाण (तृतीय वर्ष वाणिज्य) यांनी पटकावला. चॉकलेट बॉय किताब कुणाल विचारे (प्रथम वर्ष वाणिज्य) व चॉकलेट गर्ल श्रावणी चव्हाण हिने पटकावला. रोझ किंग किताब रितेश देसाई (प्रथम वर्ष वाणिज्य) व रोझ क्वीन प्रीती घेवडे (द्वितीय वर्ष वाणिज्य) यांनी पटकावला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिथिला वाडेकर व प्रा. विनय कलमकर यांनी केले. आभार क्रीडा विभाग प्रमुख वैभव घाणेकर यांनी मानले. Creation festival at Dev, Ghaisas, Keer college