संतप्त बागायतदाराने डंपर वाहतूक रोखली
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएलमध्ये समुद्रामध्ये ब्रेक वॉटरसाठी महाकाय दगडांची वाहतुक केली जात आहे. रात्रांदिवस होणाऱ्या वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीने त्रस्त बागायतदार योगेंद्र विचारे यांनी रविवारी डंपर रोखून वाहतुकच बंद केली आहे. या दगडांसाठी लावण्यात आलेल्या सुरूंगामुळे वरवेली येथील तब्बल ९० घरांना तडे गेले आहेत. Cracked houses in Varveli village
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे एलएनजी जेटीच्यासाठी समुद्रामध्ये संरक्षक भींत उभारली जात आहे. एलएनटी कंपनी सर्व नियम धाब्यावर बसवून दगडाची वाहतुक करत आहे. वरवेली येथे दगडाची खाण भाडेपट्टयावर घेतली असून दिवसरात्र चालणाऱ्या या उत्खननाकडे स्थानिक प्रशासनाने डोळेझाक केली आहे. मात्र या दगडाच्या सुरूंगामुळे वरवेली येथील तब्बल ९० घरे बाधित झाली असल्याची माहीती सरपंच नारायण आग्रे यांनी दिली. २१ जानेवारी रोजी याबाबत संबधीत जागा मालकाबरोबर बैठक झाली. होणाऱ्या नुकसानीबाबत पहाणी केली जाईल असे आश्वासन दिले. मात्र अदयाप वरवेली येथे कोणीही पाहण्यास आलेले नाहीत. Cracked houses in Varveli village
वरवेली गावातील घरांना तडे गेले असून आरसीसी बांधलेली विहीरीलाही तडे गेले आहेत. मंदिर, स्लॅपच्या घरांच्या खांबांना तडे गेले असून येथील ग्रामस्थ भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. या भयावह परिस्थितीकडे स्थानिक महसुल प्रशासन लक्ष देत नाहीत. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. Cracked houses in Varveli village
या संरक्षक भींत उभारणीसाठी ७ लाख टन दगडाचे उत्खनन केले जाणार आहे. दिवसरात्र उत्खनन सुरू आहे. वरवेली येथील खाणीतून मुख्य मार्गापर्यंत होणारी वाहतुकीमुळे डांबरी रस्ता पूर्णपणे उखडला असून माती बाहेर आली आहे. यामुळे या दिड किलोमिटरच्या परिसरात प्रचंड प्रमाणात धुळ उडत आहे. आंबा व काजुला मोहर येत आहे. अशावेळी या धुळीने संपूर्ण बागायतीवर धुळ साचल्याने उत्पन्न मिळणे कठिण झाले आहे. यामुळे त्रस्त झालेले योगेंद्र विचारे यांनी याबाबत संबधीत ठेकेदाराला समजावले होते. परंतु तरीही मोठया प्रमाणात वाहतुक होत असल्याने रविवारी दुपारी १२ वाजता दगड वाहतुक करणारी सर्व वाहने रोखुन धरली. त्यामुळे दुपारनंतर येथील दगड वाहतुक बंद होती. Cracked houses in Varveli village