विनय जोशींचा आरोप, राज्य सरकारसह कॅगकडे तक्रार
दापोली, ता. 24 : आंबेत पूल बंद-चालू-बंद करण्यात आणि लोकांना अभूतपूर्व अडचणी निर्माण करण्यात खरंच काही तांत्रिक अडचणी होत्या? की रायगड, रत्नागिरी बांधकाम विभाग, सरकारी अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक, जेट्टी मालक यांची काळी, भ्रष्ट हातमिळवणी होती. याची विभागीय चौकशी व्हावी. अशी मागणी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे. असे मुर्डी ता. दापोलीतील विनय जोशी यांनी केली आहे. Corruption in bridge repair in Ambet


इन्स्टिट्युट फॉर कॉन्फील्क्ट रिसर्च ॲण्ड रिझोल्यूशन (http://www.icrr.in/) या संस्थेचे संस्थापक असलेले विनय जोशी देशाची संरक्षण व्यवस्था, अंतर्गत सुरक्षा आदी विषयांचे अभ्यासक आहेत. विनय जोशींचे मुळ गाव दापोली तालुक्यातील मुर्डी आहे. आंबेत पुलाच्या दुरावस्थामुळे स्थानिकांसह पर्यटकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत त्यांनी अनेकवेळा आवाज उठविला होता. आता थेट महाराष्ट्र सरकारसह कॅगकडे तक्रार करण्याची भुमिका त्यांनी घेतली आहे. Corruption in bridge repair in Ambet


याबाबत पत्रकारांजवळ बोलताना ते म्हणाले की, आंबेत पूल हा रायगड व रत्नागिरी जिल्हा जोडणारा हा कोकणातील महत्वाचा पूल आहे. या पुलामुळे रत्नागिरी जिल्हयातील दापोली व मंडणगड तालुक्याला मुंबई पुणेकडे जाण्यासाठी असलेले अंतर जवळ आले आहे. आंबेत खाडीवर असलेल्या पुलामुळे या भागाला महत्व आले. तसेच पर्यटन उद्योगातही वाढ झाली. हा पूल बंद असल्याने दापोली, मंडणगड तालुक्यातील नागरिकांना व्यावहारिक, आर्थिक आणि व्यावसायिक नुकसान, अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याचा मी पाठपुरावा करत आहे. यापूर्वी मी नियंत्रक आणि महालेखापाल, कॅग, नवी दिल्ली यांना आंबेत पूल प्रकरणात काही घोटाळा झाला आहे का. याची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र याप्रकरणी अद्याप कोणतेही उत्तर नवी दिल्ली येथील कॅग कडुन आलेले नाही. त्यामूळे आता ह्या विषयावर लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. आंबेत पूल बंद होणे, पुन्हा चालू होणे, पुन्हा बंद होणे याप्रकरणी तातडीने सर्वंकष चौकशी व्हावी. यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. Corruption in bridge repair in Ambet