• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 May 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जलजीवनच्या कामात भ्रष्टाचार

by Mayuresh Patnakar
December 6, 2023
in Guhagar
236 2
9
A review of water scarcity in Guhagar

गुहागर : टंचाई कृती आराखड्याचा आढावा घेताना आमदार भास्कर जाधव

463
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार जाधव, योजनेचा बोजवारा उडणार

गुहागर, ता. 06 : जलजीवन मिशन मधील कामे ठेकेदारांनी परवान्यांच्या बळावर  मिळवून उपठेकेदाराला दिली आहेत. मात्र त्यांना पाणी पुरवठा योजनांच्या कामाचा अनुभव नसल्याने ते कामे रखडवत आहेत. तसेच या योजनांमधुन प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेचा बोजवारा उडणार आहे. असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले. ते टंचाई कृती आराखड्याच्या सभेत बोलत होते. Corruption in aquatic work

आमदार जाधव म्हणाले की, गुहागर विधानसभा मतदार संघातील जलजीवन मिशनच्या 104 योजनांसाठी 73 कोटींचा आराखडा मंजूर झाला. मात्र हा आराखडा बनविताना तेथील ग्रामस्थांना विश्र्वासात घेतले गेले नाही. योग्य पध्दतीने सर्वेक्षण झाले नाही. घाई गडबडीत बनविलेल्या आराखड्यात अनेक त्रुटी आहेत. त्यातच ज्या ठेकेदारांची बाजारात २ लाखांचीही किंमत नाही अशा ठेकेदारांनी ही कामे घेतली आहेत. परवान्याच्या बळावर घेतलेली कामे ठेकेदाराने टक्केवारीवर उपठेकेदाराकडे सोपवित आहे. ठेकेदार आणि उपठेकेदारांना पाणी योजनांच्या कामाचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कामे रखडवली जात आहेत. जलजीवनमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. ही परिस्थिती बदलली नाही तर या योजनेचा बोजवारा उडणार हे निश्चित आहे. Corruption in aquatic work

Tags: Corruption in aquatic workGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMLA Bhaskar JadhavNews in GuhagarUpdates of Guhagarआमदार भास्कर जाधवगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share185SendTweet116
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.