• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोरोनाची लाट संपली

by Guhagar News
May 10, 2023
in Bharat
55 1
0
Corona wave is over
109
SHARES
311
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

WHO ची घोषणा; जागतिक आणीबाणी हटवली

गुहागर, ता. 10 : मागील जवळपास साडे-तीन वर्षांपासून जगभरात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाची लाट आता संपली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) हटवण्यात आली आहे. अशी घोषणा जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) महासचिव डॉ. टेड्रोस यांनी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या याबाबतच्या आपात्कालीन परिस्थितीबाबतच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. जागतिक आरोग्य आणीबाणी मागे घेतली असली तरी कोरोना अजूनही जागतिक आरोग्यासाठी धोका आहे, असे WHO ने स्पष्ट केले.  Corona wave is over

जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी म्हटले की, आपत्कालीन समितीची 15 वी बैठक झाली. यामध्ये, कोविड-19 ला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेबाहेर घोषित करावे, अशी शिफारस करण्यात आली. ही शिफारस आपण स्वीकारत असल्याचे डॉ. टेड्रोस यांनी म्हटले. Corona wave is over

 जागतिक आरोग्य आणीबाणी केव्हा जाहीर झाली?

WHO ने सांगितले की 30 जानेवारी 2020 रोजी कोविडला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली. कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली तेव्हा चीनमध्ये 100 पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळले होते. त्यावेळी एकही मृत्यू झाला नव्हता. मात्र तीन वर्षांनंतर हा आकडा वाढून 70 लाखांपर्यंत पोहोचला. सुमारे 20 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले. Corona wave is over

जागतिक आरोग्य आणीबाणी का हटवली? 

WHO ने सांगितले की, गेल्या वर्षभरात कोविडच्या प्रकरणांमध्ये झालेली घट लक्षात घेऊन सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणीतून कोरोना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा इतका मोठा परिणाम झाला की शाळा ते कार्यालय बंद राहिले. या काळात बरेच लोक तणाव आणि चिंतेतून गेले. त्यातून जागतिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले. Corona wave is over

 डॉ. टेड्रोस यांनी काय म्हटले? 

जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी म्हटले की, जागतिक आरोग्य आणीबाणी हटवली असली तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे संपला नाही. मागील आठवड्यात दर तीन मिनिटाला कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू होत होता. कोरोनाचे नवीन व्हेरिएंट येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. Corona wave is over

Tags: CoronaCorona wave is overGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share44SendTweet27
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.