गुहागर, ता. 08 : शहरातील देवपाट, खालचापाट, गुरव वाडी, चिंतामणी नगर, बाजारपेठ परिसरातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण / बूस्टर डोसचे आयोजन करण्यात आले होते. हा लसीकरण कॅम्प रंगमंदिर गुहागर देवपाट नूकताच पार पडला. या कॅम्पमध्ये 52 लाभर्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. Corona vaccination camp at Guhagar


गुहागर तालुका आरोग्य अधिकारी श्री. डॉ. जागीड यांच्या मार्गदर्शनाखाली लसिकरण करण्यात आले. श्री. अमरदीप परचुरे यांच्या नेतृत्वाखाली व श्री. कल्पेश बागकर यांच्या सहकार्याने सदर लसिकरण राबाविण्यात आले होते. हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी श्री. गायकवाड साहेब, सौ. राणे नर्स, आशासेविका श्रीम. जाधव यांचे सहकार्य लाभले. यामध्ये जवळपास 52 लाभर्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. Corona vaccination camp at Guhagar

