डॉ. दिवाकर चरके : लक्षणे आढळणाऱ्यांनी तपासणीसाठी पुढे यावे
गुहागर, ता. 9 : कोरोना बाधीत असणे हा गुन्हा नाही. मात्र लक्षणे लपवण्याने तुम्ही समाजाचे नुकसान करता. तेव्हा लक्षणे आढळणाऱ्यांनी कोरानाची चाचणी करुन सामाजिक कर्तव्य पार पाडावे. असे आवाहन गुहागरचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. दिवाकर चरके यांनी केले. गुहागरमधील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्र्वभुमीवर ते सकाळशी बोलत होते.
Being infected with corona is not a crime. But by hiding the symptoms you harm the society. Those who have symptoms should test the Corana and fulfill their social duty. Such an appeal was made by Medical Officer Dr. Charake. He was speaking this morning against the backdrop of increasing number of patient in Guhagar.
गुहागर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मार्च अखेरपासून वाढु लागला आहे. या संदर्भात बोलताना तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. चरके म्हणाले की, हे सर्व रुग्ण मुंबईकरांच्या संपर्कातील आहेत. काहीजण लग्नासाठी किंवा कामासाठी मुंबईत गेले होते. तर काहींच्या घरी लग्न, शिमगोत्सवादरम्यान मुंबईकर आले होते.
त्यामुळे सध्याची कोरोना रुग्णवाढ ही शहरांतील नागरिकांच्या संपर्क आल्यामुळे झाली आहे. त्यामुळे जे ग्रामस्थ मुंबई, पुणे, कोल्हापुरमधीलशी नागरिकांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून कोरोना तपासणी करावी. कोरोनाबाधित होणे हा दोष किंवा गुन्हा नाही. मात्र अचानक आलेल्या सर्दी, ताप, घसादुखी या बाह्य लक्षणांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. कारण त्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्यांना कोरोना होऊ शकतो. त्यामधील एखाद्या व्यक्तिची प्रकृती चिंताजनक होवू शकते. म्हणून आपल्या मनात शंका उत्पन्न झाली तर त्वरीत कोरोना चाचणी करुन घ्यावी. जेणेकरुन आपल्याकरवी होणारा कोरोनाचा प्रसार थांबण्यास मदत होईल. कोराना चाचणी करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. ही भावना प्रत्येकाने जोपासावी. त्याचा प्रसार करावा. कोरोना रुग्णासंदर्भात नकारात्मक चर्चा न करता त्याने चाचणी केली म्हणून आपण त्याचे आभार मानले पाहिजेत. त्याच्या चाचणीमुळे त्याचे कुटुंब, आसपास वावरणारे अन्य ग्रामस्थ यांच्यात होणारा प्रसार थांबला. हीच ब्रेक द चेनची संकल्पना आहे. तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी हा विचार समजुन कोरोना तपासणीसाठी आग्रह धरला तर कोरोनाचा प्रसार थांबेल. असे आवाहन यावेळी डॉ. चरके यांनी केले.
संबंधित बातम्या वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा.