गुहागर, ता. 27 : लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संचलित कन्हैया प्ले स्कुल, गुहागर येथे हळदीकुंकू आणि विद्यार्थी पालकांसाठी पाककला प्रदर्शन ठेवण्यात आले होते. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम करण्यात आला. Cooking Exhibition at Kanhaiya Play School

यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी विविध प्रकारचे पदार्थ बनविले होते. यामध्ये मोदक, नारळी वड्या, गाजराचा हलवा, केक, पुरण पोळी गुलाबजाम अश्या विविध चविष्ट पदार्थांचा समावेश होता. प्रदर्शनाचा शुभारंभ संस्थेच्या सदस्य नगरपंचायत माजी शिक्षण सभापती आणि विद्यमान नगरसेविका सौ. सुजाता बागकर यांच्या हस्ते करण्यात आला. Cooking Exhibition at Kanhaiya Play School

यावेळी संस्थेच्या महिला विभाग प्रमुख सौ.स्वाती कचरेकर, उपाध्यक्ष शुभम भायनाक, प्राचार्य सौ. आसावरी राऊत, श्री. प्रसन्न कनगुटकर, विद्यार्थी पालक कमिटी अध्यक्ष सौ. मुंजे, श्री. प्रेम सुर्वे, श्री. शुभम शेटे, श्री. श्रीधर बागकर, श्री. द्विप कचरेकर तसेच विद्यार्थी आणि सर्व पालक उपस्थित होते. Cooking Exhibition at Kanhaiya Play School
