गुहागर, ता. 21 : पाककला हे क्षेत्र केवळ स्त्रियांसाठीच मर्यादित नाही तर यामध्ये पुरुषही करीअर करू शकतात. शिवाय या क्षेत्रात मुलींनीही भविष्यात संधी ओळखून भरारी घ्यावी, असे आवाहन प्रा. मनाली बावधनकर यांनी केले. नुकतेच खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) सांस्कृतिक विभागातर्फे अविष्कार युवामहोत्सव २०२२ या अंतर्गत पाककृती व रांगोळी स्पर्धा संपन्न झाल्या. Cooking and Rangoli Competition at KDB College
विद्यार्थ्यांमधील अंगभूत गुणांना वाव देणे, समाजातील समस्याविषयी जागृती करणे इ. उद्देशांनी सांस्कृतिक विभागातर्फे पाककृती व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. दोन्हीही स्पर्धेत बहुसंख्य विद्यार्थांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत कोकणचे पारंपारिक पदार्थ उकडीचे मोदक, अळूवडी, नाचणीची भाकरी व पालेभाजी आणि इतर पदार्थात कोथिंबीर वडी, पुरणपोळी, तांदळाची खीर, शेंगदाणा लाडू, तिळाचे लाडू इ. पदार्थाचे सादरीकरण झाले. पदार्थाची पौष्टिकता, चव आणि सादरीकरण या निकषावर आधारित व स्पर्धेकांशी संवाद साधून परीक्षण करण्यात आले. Cooking and Rangoli Competition at KDB College
या स्पर्धेत प्रथम क्रमाक मनस्वी चंद्रशेखर पटेकर (टी.वाय.बी.कॉम), उकडीचे मोदक द्वितीय क्रमाक विभागून स्नेहा विलास गमरे (एफ. वाय. बी. ए.), शेंगदाणा लाडू व श्रध्दा अनिल चाळके ( टी. वाय. बी. एस. सी. आय. टी), टॅकोस तृतीय क्रमाक विभागून उर्वशी राजेंद्र झिंबर (अळूवडी व सोलकढी), अक्षता अरुण गुरव ( एस. वाय. बी. कॉम) नाचणीची भाकरी व पालेभाजी, उत्तेजनार्थ – सुरज संतोष कुळे (उकडीचे मोदक) या पदार्थाना गुणानुक्रम देण्यात आले. Cooking and Rangoli Competition at KDB College
रांगोळी स्पर्धेत स्त्रीभ्रूणहत्या, पाणी वाचवा – जीवन वाचवा, लेक वाचवा-लेक शिकवा, महागाई, व्यसनमुक्ती इ. विषयावर रांगोळ्या रेखाटल्या. रांगोळी स्पर्धेत विषय निवड, रंगसंगती व सादरीकरण या निकषावर आधारित परीक्षण करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मोनिका कृष्णा बेंदरकर (टी.वाय.बी.कॉम), द्वितीय क्रमांक – प्राची प्रवीण दवंडे (एफ. वाय. बी. ए.), तृतीय क्रमांक सुरज संतोष कुळे (टी. वाय. बी. एस. सी. आय. टी), उत्तेजनार्थ – साक्षी संदीप मोरे (एफ. वाय. बी. ए.) व पूर्वा श्रीकृष्ण सुर्वे (टी.वाय.बी.कॉम) यांच्या रांगोळ्याना गौरविण्यात आले. Cooking and Rangoli Competition at KDB College
या स्पर्धेला प्राचार्य विराज महाजन आणि डॉ. बाळासाहेब लबडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. केतकी परचुरे, प्रा. प्रिया पालशेतकर, महाविद्यालयाचा शिक्षक-शिक्षकेतर वर्ग उपस्थित होता. Cooking and Rangoli Competition at KDB College