पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांचा पुढाकार
गुहागर, ता.19 : रत्नागिरी येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीत कंत्राटी सेवेत कार्यरत असलेल्या १३ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. Contractual employees remain in government service
मागील काही दिवसांपासून अनेक कर्मचारी एमआयडीसीमध्ये कंत्राटी पद्धीतीने काम करत होते. सेवेत कायम करण्याची त्यांची मागणी होती. पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेत सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एमआयडीसीने १३ जणांना नियुक्तीपत्रे प्रदान केली. निवड झालेल्या उमेदवारांमध्ये चालक, पंपचालक, निरीक्षक, शिपाई, लिपीक आदी पदांचा समावेश आहे. Contractual employees remain in government service

यासोबत राज्याभरातील एकूण ८८ जणांना कायम करण्यात आले आहे. यावेळी एमआयडीसीचे सीईओ बिपीन शर्मा, एचआर विभागाचे महाव्यवस्थापक तुषार मटकर आदी उपस्थित होते. Contractual employees remain in government service
