गुहागर तालुका भाजप आग्रही ; आगार व्यवस्थापक यांना निवेदन
गुहागर, ता. 12 : दोन वर्षाच्या कोरोना महामारी संसर्गाच्या कालखंडानंतर नवीन शैक्षणिक हंगामात गुहागर तालुक्यामधील मराठी, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, विविध विषयांचे कोर्सेस हे गुहागर तालुक्यात नियमितपणे सुरू झाले आहेत. शैक्षणिक पर्व सुरू होत असताना यामध्ये मोठी अडचण ठरत होती. ते गुहागर तालुक्यातील एसटी आगराच्या विद्यार्थ्यांसाठीच्या एसटी फेऱ्यांचा तुटवडा. यामुळे विद्यार्थ्यांनी पास काढुनही वेळेवर एसटी फे-या नसल्यामुळे सवलतीच्या दारातले काढलेले पासही निरुपयोगी ठरत आहेत. या विषयासंदर्भात गुहागर तालुक्यातून विविध क्षेत्रातुन आवाज उठत होता. मात्र, एसटी आगाराकडुन याबाबत ठोस आश्वासन देण्यात येत नव्हते. त्यामुळे याची दखल गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीने घेतली, असून आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या संदर्भातील निवेदनही दिले. Continue student bus rounds


तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या या अडचणीबाबत आगार व्यवस्थापकांशी चर्चा करत असताना वरिष्ठ कार्यालयाकडुन आम्हाला आवश्यक असणाऱ्या नवीन टायरचा पुरवठा होत नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने एसटी फेऱ्या बंद ठेवाव्या लागत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आमच्या 24 गाड्या डेपोमध्ये उभ्या आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक श्री. बोरसे यांच्याकडे संपर्क साधला असता, गुहागर आगार व्यवस्थापकानी सांगितलेली परिस्थिती खरी आहे. कोरोना कालखंड आणि त्यानंतर एसटीचा झालेला विक्रमी संप यामुळे टायरची निर्मिती रखडली होती. त्याचबरोबर कोरोना कालावधीत टायर निर्मितीकरता परराज्यातुन येणारा कच्चा मालही रखडला होता. तर रत्नागिरीमध्ये निर्माण होणारे टायर हे रत्नागिरी बरोबर सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यालाही पुरावे लागतात. त्यामुळे पुर्वीप्रमाणे एसटी फेऱ्या चालू होण्यास थोडा विलंब लागत असल्याचे त्यांनी मान्य केले. Continue student bus rounds


गुहागर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पुढील ८ दिवसात तालुक्याला आवश्यक असणाऱ्या टायरचा पुरवठा केला जाईल. त्याचबरोबर कोरोना महामारी संसर्ग कालखंडाच्या पुर्वी ज्याप्रमाणे प्रवाशांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एसटी फेऱ्या चालु होत्या, त्याप्रमाणे चालु होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचा शब्द विभाग नियंत्रक बोरसे यांनी दिला आहे. Continue student bus rounds
गुहागर आगार व्यवस्थापक वैभव कांबळे, स्थानकप्रमुख श्री. पवार यांना निवेदन देण्यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख दीपक मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. Continue student bus rounds