अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत अध्यक्ष चंद्रकांत झगडे यांचे प्रतिपादन
गुहागर, ता. 21 : ग्राहकांनी जागृत असणे गरजेचे आहे. त्यासोबत पुरवठादारांनी देखील नैतिकदृष्ट्या आपला व्यवसाय पारदर्शकपणे केला पाहिजे. ग्राहकाने आपले शोषण होण्यापासून मुक्त राहून अन्य ग्राहकाना जागृत केले पाहिजे. आपला संघर्ष कुणा व्यक्तिबरोबर् नसून अनुचित व्यापारी प्रथा, अनुचीत वृत्ती याविरोधात असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत अध्यक्ष चंद्रकांत झगडे यांनी केले. Consumers are the center of economy


गुहागर तहसील कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष गणेश धनावडे, गुहागर हायस्कुलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, पुरवठा निरीक्षक समृद्धी पेंडसे, सहाय्यक महसूल अधिकारी श्रीम. शिंदे मॅडम, सहाय्यक महसूल अधिकारी जयवंत कदम आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी अपर्णा गोयथळे, चैताली आरेकर, ऋणाली बागकर आदी उपस्थित होते. Consumers are the center of economy
श्री. झगडे पुढे म्हणाले की, ग्राहक हा राजा आहे. पण, त्याला आपले हक्क आणि अधिकार काय आहेत याची माहिती नाही. ग्राहकांसाठी केलेल्या कायद्याची जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. ग्राहकाला आपली नेमकी कुठे फसवणूक होते, हेच त्याला माहित नाही. कायदे ग्राहकांच्या बाजूने आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारीसुद्धा आपल्याकडे आहेत. पण त्याच्यापर्यंत ग्राहक पोहोचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सोन्याचा बाजार, कपड्याचा बाजार येथे ग्राहकांची हमखास फसवणूक होत असते. ग्राहकाने खरेदी करताना घेतलेल्या वस्तूची पावती घेणे आवश्यक आहे. ती पावती कशा पद्धतीची असावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. Consumers are the center of economy


ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा केन्द्रबिन्दु आहे. त्यामुळे ग्राहकाने नेहमी सजग राहिले पाहिजे. आपल्या सजग रहाण्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहणार आहे. ग्राहकांसाठी उपयुक्त असलेला ग्राहक संरक्षण कायदा 24 डिसेंबर 1986 ला संसदेत एकमताने मंजूर म्हणून हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. हा कायदा निर्माण होण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केलेल्या भगीरथ प्रयत्नांची माहिती देऊन गेली 48 वर्षे सेवाभावी वृत्तीने हजारो कार्यकर्ते ग्राहक जागृतीसाठी कार्य करत आहेत. देशव्यापी संघटन असलेल्या ग्राहक पंचायतची कार्यपद्धती विशद केली. Consumers are the center of economy


गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. कांबळे यांनी ग्राहक संरक्षण कायदा हे ग्राहकांसाठी एक शस्त्र असून त्याचा वापर करायला शिकले पाहिजे. कायद्याने मिळालेले अधिकार समजावून दुसरी बाजू आपली कर्तव्यहि आपण समजून घेतली पाहिजेत. कायद्याने मिळाले विविध अधिकार विविध उदाहरणे देऊन समजावून देऊन चोखंदळपणा, कृती, सामाजिकता, एकाता,विविध भडक फसव्या जहिराती, सेल याबाबत आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. आपली फसवणूक झाल्यास जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आयोगाकडे दावा कसा दाखल करावा. त्याठिकाणी कशी कार्यपद्ध्ती असते, याचे सखोल मार्गदर्शन केले. Consumers are the center of economy
ग्राहक दिनानिमित्त गुहागर तहसील कार्यालयाच्यावतीने ग्राहक जनजागृती, कर्तव्य व जबाबदारी या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. प्राथमिक गटात गार्गी क्षीरसागर, मयुरी कडव, वेद सुर्वे यांनी, तर माध्यमिक गटात उर्वी बागकर, कार्तिकी भोसले, अक्षरा रोहिलकर यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केले. विजेत्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. Consumers are the center of economy