• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्राहक कायदा हे एक शस्त्र आहे

by Ganesh Dhanawade
January 2, 2023
in Ratnagiri
116 1
0
Consumer law is a weapon
228
SHARES
650
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा यांचे प्रतिपादन

गुहागर, ता.02 : ग्राहकांसाठी 2019 चा कायदा एक शस्त्र असून त्याचा ग्राहकांनी प्रत्येक ठिकाणी उपयोग करून होणारी फसवणूक थांबवावी, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नारायणभाई शहा यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. रत्नागिरी येथे प्रथमच राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा झाली. या सभेला देशातील ३७ प्रांतातून राष्ट्रीय स्तरावरील ग्राहक पंचायतीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. Consumer law is a weapon

Consumer law is a weapon

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय राष्ट्रीय संघटन मंत्री श्री. दिनकर सबनीस यांनी ग्राहक जागृत होणे अत्यंत महत्त्वाचे असून विविध फसव्या जाहिराती फॅशन, मार्केटिंग शैक्षणिक संस्था यामध्ये जागरूकता असावी असे प्रतिपादन केले.

Consumer law is a weapon

राष्ट्रीय कार्यकारणी सहसचिव सौ. नेहा जोशी यांनी ग्राहक चळवळ ही लोकाभिमुख व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर अप्पर जिल्हाधिकारी सौ. सुनंदा साठे यांनी ग्राहक पंचायतीच्या कामाचे कौतुक केले. अत्यंत पारदर्शक आणि निःस्वार्थी काम करणारे कार्यकर्ते या संघटनेत असून भविष्यात जिल्हा कार्यालय व आपण मिळून ही चळवळ समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचूया, असे आवाहन त्यांनी केले. Consumer law is a weapon

Consumer law is a weapon

या कार्यक्रमासाठी विविध कार्यालयाचे अधिकारी, राष्ट्रीय सचिव श्री. जयंतीभाई कथारिया, राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य श्री. विजय भागवत, कोकण प्रांत अध्यक्ष चंद्रकांत झगडे, सचिव श्री. मानसिंग यादव, कोषाध्यक्ष सौ. वेदा प्रभुदेसाई, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, महिला जागरण प्रांतच्या प्रणिता धामणस्कर, जिल्हा कार्यकारिणी सह सचिव निलेश गोयथळे, आनंद ओक, प्रांत संघटक सुकांत चक्रदेव, गुहागर तालुकाध्यक्ष गणेश धनावडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. रोहिणी रजपूत आदी उपस्थित होते. Consumer law is a weapon

Tags: Consumer law is a weaponGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share91SendTweet57
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.