• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महावितरणला ग्राहक मंचाचा दणका

by Guhagar News
January 31, 2024
in Ratnagiri
397 4
1
Consumer forum gave a blow to Mahavitran
780
SHARES
2.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शेतकऱ्याला लाखाचे बील; त्रासापोटी 10 हजार देण्याचे आदेश

रत्नागिरी, ता. 31: महावितरणने रिंडिंग न घेता १ लाख ५ हजाराचे बिल पाठवल्याने शेतकऱ्याने ग्राहक मंचाकडे दाद मागितली होती. याप्रकरणी ग्राहक मंचाने शेतकऱ्याच्या तक्रार अर्जावर निकाल देताना महावितरणने शेतकऱ्याला झालेल्या त्रासापोटी १० हजार रुपये आणि तक्रार अर्जाच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचा आदेश दिला. याबाबत सोमेश्वर येथील सुहास भास्कर पटवर्धन यांनी ग्राहक मंचाकडे दाद मागितली होती. याबाबत अॅड. अर्थव पटवर्धन यांनी तक्रारदारांची बाजू ग्राहक मंचासमोर मांडली. Consumer forum gave a blow to Mahavitran

सोमेश्वर येथील विनयानंद लिमये यांच्या मिळकतीचे मुखत्यार असलेले सुहास पटवर्धन यांनी मिळकतीमध्ये कृषीपंपासाठी महावितरणकडे वीज जोडणी मागितली होती. त्यानुसार त्यांना जोडणी देण्यात आली. मात्र मीटरचे रिडींग न घेता पटवर्धन यांना दर महिन्याला वेगवेगळया किंमतीची अव्वाच्या सव्वा बीले पाठविली होती. त्यामुळे पटवर्धन यांनी ७ ते १९ मे २०२१ ला ऑनलाईन तक्रार दाखल केली. विजेचा जास्त वापर होत नसताना बील जास्त कसे येते याबाबत अनेकदा तोंडी तक्रारही केली. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीसाठी महावितरण कंपनीने २० हजार ८३० युनिटचे पटवर्धन यांना १ लाख ५ हजार ३२० रुपयांचे बिल पाठविले. तक्रारदार पटवर्धन यांनी महावितणरला मीटर बसवल्यापासून सप्टेंबर २०२१ पर्यंतचा बील भरल्याचा सर्व तपशील कर्मचाऱ्यांना दाखवला. त्यावेळी त्यांनी चुक मान्य करुन बिलामधून रक्कम ५९ हजार २६० रुपये वजा करून ४६ हजार ६० रुपये भरण्यास सांगितले. परंतु पटवर्धन यांनी ही रक्कम जास्त असल्याने बील भरण्यास नकार दिला आणि त्यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. ग्राहक मंचाने महावितरणला दणका देत शेतकरी पटवर्धन यांना झालेल्या त्रासापोटी १० हजार रुपये आणि अर्जाच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले. Consumer forum gave a blow to Mahavitran

तसेच त्यांना दिलेले बील रद्द करून सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीतील सुधारित बील द्यावे. तसेच नवीन मीटर बसवून दयावे व सदर नवीन मीटरचा येणारा खर्च तक्रारदाराकडून घ्यावा. या आदेशाची अंमलबजावणी आदेश झाल्यापासून ४५ दिवसात करायची आहे. या आदेशाची पूर्तता न झाल्यास तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम ७१ व ७२ प्रमाणे दाद मागता येणार आहे. Consumer forum gave a blow to Mahavitran

Tags: Consumer forum gave a blow to MahavitranGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share312SendTweet195
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.