गुहागर, ता. 27 : खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभागामार्फत भारतीय संविधान आणि बालहक्क या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. Constitution Day at KDB College
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गायकवाड, राजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. विराज महाजन, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. सोळंके, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री. पी. व्ही. कपाडिया, तालुका विधी सेवा समिती गुहागर चे पॅनल विधिज्ञ श्री. एस. जी. अवेरे आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्रा. विराज महाजन सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा संविधानिक मूल्ये व संवर्धनाची गरज तसेच जनमानसावर पडलेली अमिट छाप यावर भाष्य केले. Constitution Day at KDB College
यानंतर श्री. एस. जी. अवेरे यांनी सायबर गुन्हे व गुन्ह्यांची कारणे आणि नागरिकांनी बाळगण्याची सतर्कता ही अत्यंत आवश्यक असून शाळा, महाविद्यालयामार्फत अशा प्रकारचे उपक्रम समाजात राबविण्यात आले पाहिजेत या विषयावर मार्गदर्शन केले. न्यायाधीश पी. व्ही. कपाडिया यांनी भारतीय संविधान आणि बालहक्क या विषयावर भारतीय संविधान जिवंत ठेवण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची असून संविधानिक मुल्ये हि सर्वश्रेष्ठ आहेत. आणि त्यापलीकडे जाऊन ती संवर्धित करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे हे अधोरेखित केले. Constitution Day at KDB College
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एम. आर. गायकवाड यांनी बदलत्या काळात संविधानिक मूल्ये रुजविण्याची जबाबदारी ही सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी जतन करणे गरजेचे असल्याचे सूचित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रामेश्वर सोळंके यांनी केले तर प्राध्यापिका सौ. मालवणकर मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमाकरीता तालुका विधी सेवा समितीचे न्यायालयीन कर्मचारी श्री.राजेश चिपळूणकर, श्री.निसार खेरटकर व श्री. मुकंद कदम उपस्थित होते. Constitution Day at KDB College