• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

घटनापीठाचा निकाल 15 मे पूर्वी लागणार?

by Mayuresh Patnakar
May 8, 2023
in Bharat
82 0
0
Constitution Bench Result before 15 May
160
SHARES
458
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शिवसेनेतील संघर्ष : निकालाची उत्सुकता देशाला

गुहागर, ता. 08 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र? महाराष्ट्रातील सत्ता बदलावर काय निर्णय होणार?  सध्याचे सरकार पडणार की रहाणार ? या सर्व प्रश्नांवर घटनापीठ काय निकाल देते. याकडे संपूर्ण देशात उत्सुकता आहे. हा निकाल पुढच्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनापीठाच्या निकालात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसवर काय निर्णय येणार? यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे. Constitution Bench Result before 15 May

ठाकरे गटाकडून निकालानंतर शिंदे फडणवीस सरकार पडेल, असे दावे केले जात आहेत. या निकालासाठी आता फक्त चार ते पाच तारखा उरल्या आहेत. यामध्ये ८ ते १२ मे या कालावधीत सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा आहे. Constitution Bench Result before 15 May

घटनापिठाने शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अपात्र ठरतील, असे जाणकार म्हणत आहेत. त्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. तर दुसरीकडे जवळपास २६ जून २०२२ पासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भातच्या प्रकरणावर सर्वोच न्यायालयात सुनावणी सुरु होती. Constitution Bench Result before 15 May

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर १४ फेब्रुवारी ते १६ मार्च सलग सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखीव ठेवला. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात तरी हा निकाल लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Constitution Bench Result before 15 May

ज्या घटनापीठासमोर राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी झाली, ते पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ होतं. त्यापैकी एक न्या. एम आर शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल यायचा असेल तर त्याच्याआधीच येणार हे उघड आहे. न्यायमूर्तींच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस हा समारंभाचा असतो. अगदी त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता तशी कमी असते. १३ आणि १४ मे रोजी शनिवार आहे. त्यामुळे ८ ते १२ याच तारखांमध्ये निकालाची शक्यता अधिक आहे. Constitution Bench Result before 15 May

Tags: Constitution Bench Result before 15 MayGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.