गुहागर, ता. 26 : श्रावण सोमवारचे औचित्य साधुन गुहागर विधानसभा मतदार संघातील गुहागर, खेड व चिपळुण या तीनही तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने शहरातील जागृत श्रीदेव व्याडेश्वराला एकत्रित अभिषेक करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर शिर्के, तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, शरद शिगवण, अरुण चव्हाण, राहुल बामणे, तालुका महिला संघटक सुप्रिया चव्हाण , जिल्हा युवा सचिव अमरदिप परचुरे, तालुका संघटक प्रल्हाद विचारे, तालुका समन्वयक नारायण गुरव , तालुका युवा अधिकारी रोहन भोसले व तमाम पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. Consecration of Vyadeshwar by Shiv Sainiks


अभिषेक करण्याचा मान गुहागरला मिळाल्याने शहर प्रमुख निलेश मोरे व त्यांचे सहकारी तयारीला लागले आहेत. युवासेनेचे पदाधिकारी त्यांना सहकार्य करीत आहेत. तालुका उपसचिव शाम आठवले यांनी या कार्यक्रमात पुढाकार घेतला असून खेड, चिपळुण व गुहागरच्या ग्रामीण भागातून असंख्य शिवसैनिक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.यावेळी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून गुहागर मतदार संघाचा सर्वांगीण विकास होवू दे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदारभाई कदम व पालकमंत्री उदय सामत यांना उत्तम आरोग्य, दिर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातुन सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा घडो अशी प्रार्थना शिवसैनिकांकडुन करण्यात येणार आहे. Consecration of Vyadeshwar by Shiv Sainiks


गावागावातुन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी- माजी पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी होणार आहेत. अभिषेक कार्यक्रम श्रीदेव व्याडेश्वर मंदिर येथे सकाळी ९ वा. सुरु होणार असल्याची माहीती गुहागर शिवसेना तालुका प्रमुख दिपक कनगुटकर व शिवसेना तालुका सचिव संतोष आग्रे यांनी दिली. Consecration of Vyadeshwar by Shiv Sainiks