• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आज होणार युती

by Mayuresh Patnakar
January 22, 2023
in Bharat
678 7
0
Conjunction of Venus & Saturn
1.3k
SHARES
3.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आकाशात पहाता येणार विलक्षण नजारा

गुहागर, ता. 22 :  शुक्र आणि शनी या  दोन ग्रहांची युती आज रविवार दि. २२ जानेवारी २०२३ ला होणार आहे. म्हणजे हे दोन ग्रह एकमेकांच्या एकदम जवळ आलेले दिसतील. अशी माहिती तारांगण चिपळूणचे खगोलप्रेमी दिपक आंबवकर यांनी दिली आहे. Conjunction of Venus & Saturn

ही युती ओळखायची कशी  हे सांगताना दिपक आंबवकर म्हणाले की, रविवारी सायंकाळी सूर्य अस्ताला गेल्यावर ७.१५ नंतर बऱ्यापैकी अंधार पडायला लागलेला असेल. त्या वेळी पश्चिमेला तोंड करून उभे राहिल्यास एक तेजस्वी चांदणी आकाशात दिसेल ती चांदणी म्हणजे शुक्र ग्रह आहे. आणि बरोबर त्याच्या अगदी जवळ वरच्या बाजूला पिवळसर अंधुक एक चांदणी दिसेल ती चांदणी म्हणजे शनी ग्रह असेल. हे ग्रह आपल्याला आकाशात अगदी जवळ आलेले दिसले तरी प्रत्येक्षात मात्र ते एकमेकांपासून कोट्यवधी की.मी. अंतरावर असणार आहेत. Conjunction of Venus & Saturn

२३ जानेवारी म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी बरोबर उलट परिस्थिती दिसणार आहे. ती म्हणजे शनी शुक्राला ओलांडून पश्चिमेकडे गेलेला दिसेल म्हणजे या दिवशी शनी खाली असेल तर त्याच्या बरोबर वरच्या बाजूला शुक्र ग्रह असेल. हे दोन्ही दिवस खगोल निरीक्षकांसाठी खूप महत्वाचे आहेत. या दोनही दिवशी या ग्रहांच्या स्थानात होणारा बदल उघड्या डोळ्यांनी चांदणीच्या स्वरूपात पाहता येणार आहे. Telescope मधून हे दोनही ग्रह एकाच वेळी एकाच लेन्स मधून पाहता येणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि खगोल प्रेमींनी या खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा. असे आवाहन आंबवकर सरांनी केले आहे. Conjunction of Venus & Saturn

Tags: Conjunction of Venus & SaturnGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSaturnUpdates of GuhagarVenusगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share533SendTweet333
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.