दि. १ व २ मार्च रोजी आकाशात पहाता येणार विलक्षण नजारा
गुहागर, ता. 01 : गुरू आणि शुक्र या दोन ग्रहांची युती आज १ आणि २ मार्च २०२३ रोजी पश्चिम आकाशात पाहायला मिळणार आहे. म्हणजे हे दोन ग्रह एकमेकांच्या एकदम जवळ आलेले दिसतील. अशी माहिती तारांगण चिपळूणचे खगोलप्रेमी दिपक आंबवकर यांनी दिली आहे. Conjunction of Jupiter and Venus

खगोल अभ्यासक श्री.दीपक आंबवकर सर यांनी दिलेल्या माहिती नुसार सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू आणि सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र यांची युती १ आणि २ मार्च २०२३ रोजी पश्चिम आकाशात पाहायला मिळणार आहे. या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद घेण्यासाठी श्री.दीपक आंबवकर यांनी आठ दिवसांपूर्वीच दि. २३.०२.२०२३ पासून खगोल प्रेमींना गुरू आणि शुक्र या दोन ग्रहांचे आकाशात निरीक्षण कसे करायचे याचे मार्गदर्शन केले होते. त्या प्रमाणे अनेक विद्यार्थी, खगोल प्रेमी दररोज उघड्या डोळ्यांनी या दोन ग्रहांमधील अंतर कसे कमी होते आहे याचे निरीक्षण करीत आहेत. Conjunction of Jupiter and Venus
ज्यांनी या पूर्वी या ग्रहांचे निरीक्षण केले नसेल त्यांनी दि.१ आणि २ मार्चला सायंकाळी सूर्य अस्ताला गेल्या नंतर सायंकाळी ७ .१५ ते ७.४५ या वेळेत पश्चिम दिशेला पाहिले असता दोन तेजस्वी चांदण्या आकाशात आपले लक्ष वेधून घेतील. कारण त्यांच्या इतक्या तेजस्वी चांदण्या त्या वेळेस पश्चिम आकाशात असणार नाहीत. त्यांची तेजस्विता आणि आणीं त्यांची युती म्हणजेच एकमेकींच्या जवळ आलेल्या चांदण्या आपले लक्ष वेधून घेतील. Conjunction of Jupiter and Venus
यातील वरील फिकट पिवळसर चांदणी म्हणजे सूर्य मालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू असून त्या खाली असणारी तेजस्वी चांदणी म्हणजे शुक्र ग्रह आहे. हे दोनही ग्रह आकाशात इतक्या जवळ आल्याने खगोल प्रेमींसाठी एक मोठी पर्वणीच आहे. कारण त्यांना दुर्बिणी मधून एकाच वेळी एकाच लेन्स मधून पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. Conjunction of Jupiter and Venus

दुसरी महत्वाची बाब म्हणजे 2 तारखेला याच वेळी निरीक्षण केले असता बरोबर उलट स्थिती असेल. म्हणजेच शुक्र ग्रह वर तर गुरू त्या खाली असेल. असा गुरू आणि शुक्र ग्रहांच्या युतीचा योग पुन्हा २४ वर्षांनी येणार असून तो आपल्याला २०४७ साली पाहायला मिळणार आहे. त्या मुळे या खगोलीय घटनेचा अनोखा नजारा पाहून सर्व खगोल प्रेमींनी आनंद घ्यावा. असे आवाहन खगोल प्रेमी शिक्षक श्री.दीपक आंबवकर तारांगण ग्रुप चिपळूण यांनी केले आहे. Conjunction of Jupiter and Venus
या पूर्वी २२ जानेवारी २०२३ रोजी शनी आणि शुक्र ग्रहांची युती भव्य दुर्बिणीद्वारे श्री. दीपक आंबवकर यांनी चिपळूण मधील गोविंद गडावरून खगोल प्रेमींना दाखवली होती. Conjunction of Jupiter and Venus
