गुहागर, ता. 11 : शिर्डीच्या साईबाबांचे भक्त देशभर पसरलेले आहेत. या भक्तांच्या श्रद्दास्थानाला हिंदु मुस्लीमतेची झालर लावून त्यांची बदनामी करण्याचे कारस्थान 2015 पासून सुरु झाले. आत्ताच 30 सप्टेंबरला उत्तरप्रदेशातील धर्मनगरी समजल्या जाणाऱ्या काशीमधील काही छोट्या मोठ्या मंदिरातून सनातन रक्षक दलाच्या अजय शर्मा याच्या पुढाकारातून साईबाबा यांच्या मुर्त्या काढून गंगेत विसर्जित केल्याची घटनासमोर आली. पोलीस प्रशासनाने या अजय शर्माला त्याच दिवशी रात्री बेड्या ठोकल्या व त्याच्यावर गुन्हा दाखल केला. साईबाबांच्या मुर्त्या काढल्याच्या या घटनेमुळे साईभक्त तीव्र संताप व्यक्त करत आहे. Congress hand behind Saibaba’s defamation
साईबाबांविषयी मागील दशक भरात उलटसुलट चर्चांना पेव फुटला आहे. त्याची सुरुवात केली होती शंकराचार्य स्वरूपानंद यांनी. साईबाबा हिंदू नाहीत. ते साई नसून चांदमियां आहेत, असा नवीन जावईशोध त्यांनी लावला. तसेच हिंदूंनी त्यांची पूजा करू नये, फळ मिळणार नाही असेही ते म्हणाले होते. तेव्हापासून हा वाद सातत्याने उकरून काढला जातो. त्यानंतर 2022 मध्ये त्यांच्या गादीवर बसलेले कथित शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनीही साईबाबांना विरोध करण्याची परंपरा चालू ठेवली. शंकराचार्य गादीवर त्यांची नियुक्ती झाल्यामुळे अनेक संतांनी विरोध केला होता. त्यांची नियुक्ती नियमानुसार केलेली नसल्याचा आरोप संन्यासी आखाड्याकडून करण्यात आला होता. Congress hand behind Saibaba’s defamation
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद काँग्रेसची कठपुतली?
साईबाबा विवादाचे प्रणेते शंकराचार्य स्वरूपानंद यांची काँग्रेसशी घनिष्ठ संबंध होते. दिग्विजयसिंग यांची स्वरूपानंद यांच्याशी अतिशय जवळीक होती. जसे स्वरूपानंद यांचे काँग्रेसशी नाते होते तसेच नवीन नियुक्त अविमुक्तेश्र्वरानंद यांचीही आहे. त्यांची शंकराचार्यपदी नियुक्ती काँग्रेसच्या आदेशावरून झाल्याचे आरोप संतांनी केले आहेत. त्यांच्या शंकराचार्य गादीवर नियुक्ती होण्यास संतांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांची नियुक्ती थांबवली होती. पण त्याचवेळी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी अविमुक्तेश्र्वरनंद यांना ‘शंकराचार्य’ असा उल्लेख करून पत्र पाठवले आणि एकप्रकारे त्यांच्या नियुक्तीला समाज मान्यता असल्याचा पुरावा तयार करून दिला होता. तेव्हापासून काँग्रेस आणि अविमुक्तेश्र्वरानंद यांची जणू अघोषित युती दिसून आली आहे. अलीकडेच त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचेही चांगले संबंध असल्याचे समोर आले आहे. कारण जुलै 2024 मध्ये उद्धव ठाकरेंच्या घरी त्यांनी भेट दिली होती. तिथे त्यांनी एक राजकीय वक्तव्य दिलं होतं. ते म्हणाले होते, “उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे”. इतकेच काय तर याच अविमुक्तेवरानंद यांनी अयोध्येतील राममंदिर उद्घाटन सोहळ्यासही विरोध केला होता. त्यामुळे हे शंकराचार्य कोणाच्या इशाऱ्यावर वक्तव्य देतात हे लक्षात येते. Congress hand behind Saibaba’s defamation
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ आल्यावरच साईबाबा विवाद समोर का येतो?
साईबाबा विवाद आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका यांचे एक वेगळेच कनेक्शन आहे. 2015 मध्ये महाराष्ट्र विधानसभा तोंडावर असताना शंकराचार्य स्वरूपानंद यांनी साईबाबा यांच्याविषयी विवादित वक्तव्य करून हा विवाद उभा केला होता. त्यानंतर 2020 विधानसभा निवडणूक दरम्यान साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून वाद सुरू झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साईबाबांचे जन्मस्थान पाथरी असल्याचे वक्तव्य केल्यामुळे वाद झाला होता. आणि आता 2024 च्या विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आलेल्या असताना साईबाबा विवाद पुन्हा समोर आणला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर साईबाबा विवाद का समोर येतो याचा विचार झाला पाहिजे. Congress hand behind Saibaba’s defamation
भाजप आणि हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात षडयंत्र?
महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात साईबाबांचे मोठ्या संख्येने भक्त आहेत. शहरी, ग्रामीण व दुर्गम भागातून मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी शिर्डीत दर्शनासाठी येतात. तरुण वर्ग दरवर्षी हजारोच्या संख्येने शिर्डी वारी काढून दर्शनासाठी जातात. त्यांच्या मनात साईबाबांविषयी अपार श्रद्धा आहे. वारकरी संप्रदाय, गजानन महाराज भक्त परिवार, स्वामी समर्थ भक्त परिवार यांच्या प्रमाणेच मोठा भक्त परिवार साईबाबांचा सुद्धा आहे. अशा पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशातून साईबाबा विवादाची ठिणगी टाकली जाते. उत्तरप्रदेश हा भाजप आणि योगी आदित्यनाथ यांचा गड आहे. सध्याचा वाद तर थेट धर्मनगरी काशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा मतदारसंघातून सुरू झाला आहे. दरवेळी शंकराचार्य यांच्याच माध्यमातून विवादित वक्तव्य समोर येते. शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च संत पद आहे. त्यामुळे हिंदू धर्माचा किंवा हिंदुत्ववाद्यांचा साईबाबांना विरोध असल्याचे षडयंत्रपूर्वक भासवले जाते. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील कोट्यवधी साई भक्तांवर होतो आणि त्यांची हीच भावना होते की साई बाबांना भाजप, आरएसएस आणि सगळे हिंदुत्ववादी विरोध करतात. किंबहुना तसाच (अप)प्रचार सोशल मीडियातून होत आहे. त्याचा परिणाम मतदानावर होईल आणि भाजपचे हिंदू मतदान कमी होईल असे हे सुनियोजित षडयंत्र आहे. Congress hand behind Saibaba’s defamation
हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी पुन्हा एक टूलकिट?
साईबाबा विवाद आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कनेक्शन पाहता भाजपच्या विरोधात पुन्हा एक टूलकिट सक्रिय झाले आहे की काय अशी शंका येते. अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्रानंद म्हटले की हिंदू धर्मात 127 संप्रदाय आहेत. या सर्व संप्रदायात आपसी समन्वय आहे. या संप्रदायात एखाद्या गोष्टीवर वेगवेगळी मतं असू शकतात, परंतु एखाद्याचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. ज्या मुर्त्या आज काढल्या जात आहेत त्या अनेक वर्षापूर्वी कोणी स्थापित केल्या होत्या? जे आज मूर्ती काढत आहेत, त्यांची कालपर्यंत आस्था होती आणि आज नाही? यामागे महाराष्ट्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू समाजात फूट पाडण्याचे तर षडयंत्र तर नाही ना? आणि अजय शर्मा टूलकिट गँगचा हिस्सा तर नाही ना? अशी शंका त्यांनी उपस्थित केली. Congress hand behind Saibaba’s defamation