कामाच्या धावपळीत क्रीडा महोत्सव म्हणजे आनंदाचा क्षण- चंद्रकांत हळबे
रत्नागिरी, ता. 06 : वर्षभर धावपळ व लेखापरीक्षण, ऑनलाईन काम, जीएसटी यासह अनेक कामात व्यस्त असलेल्या सीए, करसल्लागार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा महोत्सव हा एक आनंदाचा क्षण असतो. यातून सर्वांना भरपूर आनंद मिळतो. तन व मन यांचा संयोग म्हणजे आनंद. महोत्सवात सर्वांनी स्पर्धांमध्ये भाग घेऊन आनंद लुटलात याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे यांनी केले. Concludes Sports Festival of CA, Consultants
करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे सीए, करसल्लागार व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा महोत्सवाची सांगता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सीए वरदराज पंडित, एंजल ब्रोकिंगचे प्रतिनिधी, करसल्लागार राजेश सोहनी, सीए इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये उपस्थित होत्या. Concludes Sports Festival of CA, Consultants
या स्पर्धेतील विजेत्यांना पदक देऊन गौरवण्यात आले. क्रिकेट स्पर्धेत चांगल्या कामगिरीबद्दल रोख बक्षीसेही देण्यात आली. या स्पर्धेकरिता एंजल ब्रोकिंगचे बहुमोल सहकार्य लाभले. याबद्दल प्रतिनिधी राजेश सोहनी यांचे विशेष आभार मानण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा संस्थेचे पदाधिकारी, सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेचे पदाधिकारी, स्पर्धा कमिटीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. Concludes Sports Festival of CA, Consultants
स्पर्धांचा निकाल
बुद्धिबळ- विजयी वरद पेठे, उपविजयी- वल्लभ महाबळ, कॅरम एकेरी- अतुल पंडित, सीए मिनल काळे, कॅरम दुहेरी- अक्षय प्रभुदेसाई व अतुल पंडित ओम काळोखे व निशांत अभ्यंकर, बॅडमिंटन पुरुष दुहेरी- विजयी केतन रहाटे व वरद पटवर्धन, उपविजयी- राजेश सोहनी, राजेश गांगण. महिला- रेणू जोशी व सीमा दसाणा, मोनिका कोलबकर व नेहा वळंजू, बॅडमिंटन (सदस्यांकरिता) एकेरी- सीए वरद पटवर्धन, राजेश सोहनी. बॅडमिंटन (विद्यार्थ्यांकरिता)- हर्षद पटवर्धन, तन्मय मराठे. महिला एकेरी- रोशनी देसाई, सांची डांगे. क्रिकेट विजयी संघ- एसएस ११, उपविजयी- क्रेझी फोर्स. अंतिम सामन्यातील सामनावीर व सर्वोत्कृष्ट गोलंदाज- भूषण पाटणकर, मालिकावीर – अनिष गांगण, सर्वोत्कृष्ट फलंदाज- अमर नेवरेकर, साखळी सामन्यातील सामनावीर- आतिश थुळ, सर्वेश पाटील, अक्षय प्रभुदेसाई, केतन रहाटे, अनिष गांगण, अमर नेवरेकर. Concludes Sports Festival of CA, Consultants