जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात संगणक प्रशिक्षण
गुहागर, ता. 31 : रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अल्पदरात संगणक प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ही रक्षाबंधननिमित्त भेट दिली आहे. या उपक्रमामध्ये 4 हजार 500 रु. फी असलेले संगणक अभ्यासक्रम केवळ 1900 रुपयांत शिकता येणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष साहील आरेकर यांनी दिली आहे. Computer training for students at low cost
रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संगणक प्रशिक्षण अभियानाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष साहील आरेकर यांच्या हस्ते रक्षाबंधन दिनी चिपळूणमध्ये झाला. या अभियाना अंतर्गत दिशा संगणक केंद्रातर्फे (Disha Computer Center) रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात संगणक प्रशिक्षण घेता येणार आहे. यामध्ये फोटोशॉप, कोरलड्रॉ, अकौंटींग, टॅली प्राईम, प्रोग्रामिंग, सी व सी ++, ॲडव्हान्स एक्सेल, एमएस ऑफीस, ग्राफीक्स या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या प्रत्येक अभ्यासक्रमाची फी 4 हजार 500 इतकी होते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अभियानाअंतर्गत कोणताही एक अभ्यासक्रम केवळ 1 हजार 900 रु. फी भरुन शिकता येणार आहे. हे अभियान 30 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2023 या महिनाभराच्या कालावधीत सुरु रहाणार आहे. Computer training for students at low cost
या अभियानाअंर्गत प्रवेश घेण्यासाठी रत्नागिरी, लांजा व राजापूर या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी 8421551239, चिपळूण संगमेश्र्वर व खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी 7276865033 आणि गुहागर, दापोली व मंडणगड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी 8262013033 या क्रमांकावर संपर्क साधावा. एकाच कॉलमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरुन ऑनलाइन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. विद्यार्थ्याकडून 1900 रु. फी जमा झाल्यावर दिशा संगणक प्रशिक्षण केंद्राद्वारे त्यांचे ऑनलाइन अथवा ऑफलाइन पध्दतीने प्रशिक्षण सुरु होणार आहे. Computer training for students at low cost
याबाबत बोलताना रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष साहील आरेकर म्हणाले की, रक्षाबंधन निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्याना आम्ही ही आगळीवेगळी भेट देत आहोत. प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची उर्वरित फी संघटनेतर्फे भरली जाणार आहे. या अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमाला दिशा संगणक केंद्राचे संचालक रितेश कोतवडेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष राहुल सावंत, राष्ट्रवादी युवती जिल्हा सचिव प्रणिता घाडगे, ओंकार पटवर्धन, संकेत चाळके आदी उपस्थित होते. Computer training for students at low cost